BJP : इंडिगो एअरलाईन्सच्या २००० हून अधिक कर्मचाऱ्यांचा भाजपात जाहीर प्रवेश

महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढली!

44
BJP : इंडिगो एअरलाईन्सच्या २००० हून अधिक कर्मचाऱ्यांचा भाजपात जाहीर प्रवेश
  • प्रतिनिधी

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वाढत्या लोकप्रियतेला आणखी एक मोठे यश मिळाले असून, इंडिगो एअरलाईन्सच्या २००० हून अधिक कर्मचाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

मोदी-फडणवीस नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश

भाजपाने (BJP) ‘राष्ट्र प्रथम’ हे धोरण कायम ठेवत कामगार व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सातत्याने कार्य केले आहे. याच धोरणावर विश्वास ठेवत इंडिगो एअरलाईन्समधील कर्मचाऱ्यांनी भाजपात दाखल होण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

यावेळी बोलताना भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील भाजपा-शिवसेना (महायुती) सरकार कामगार व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. रोजगारसंधी वाढवणे, कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांच्या कल्याणासाठी निर्णय घेणे हेच आमचे ध्येय आहे.”

शिवसेना (उबाठा) सोडून भाजपा परिवारात प्रवेश

विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांचे युनियन आधी शिवसेना (उबाठा) संलग्न भारतीय कामगार सेनेचा भाग होते. मात्र, त्यांनी भाजपाच्या (BJP) विचारधारेवर विश्वास ठेवत पक्षप्रवेश केला.

(हेही वाचा – REPO Rate Cut ? रिझर्व्ह बँक रेपो दरात कपात करणार?)

पक्षप्रवेश करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये –

युनिट अध्यक्ष : करण कांबळे
युनिट सरचिटणीस : दिनेश शेवाळे
युनिट उपाध्यक्ष : सिराज हाश्मी
युनिट कोषाध्यक्ष : चंदन कांडू
संयुक्त खजिनदार : मोहम्मद शाहिद हुसेन
युनिट सेक्रेटरी : रणजीत नरे, राकेश कदम, लक्ष्मण सुरवसे, विजय यादव
युनिट समिती सदस्य : अंकुश निकम, सुनील लोखंडे, अंकुश इंगळे, संदीप कांबळे, शैलेश पवार, सचिन काटकर आदींचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील कामगार संघटनांमध्ये भाजपाची ताकद वाढतेय!

या सोहळ्यात विलेपार्ले विधानसभेचे आमदार पराग अळवणी, एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईजचे ऑल इंडिया अध्यक्ष नितीन जाधव, सरचिटणीस सुहास माटे, योगेश आवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवसेनेला मोठा धक्का – भाजपा कामगार संघटनांमध्ये मजबूत

इंडिगो कर्मचाऱ्यांचा भाजपात (BJP) प्रवेश म्हणजे शिवसेना (उबाठा) साठी मोठा धक्का मानला जात आहे. एकेकाळी कामगार चळवळीतील मजबूत पक्ष म्हणून ओळख असलेल्या शिवसेनेच्या संघटनांमधील मोठा गट भाजपाच्या (BJP) विचारधारेकडे वळू लागला आहे.

(हेही वाचा – Tribal Ashram Schools : राज्य सरकारचा “एक दिवस आदिवासी आश्रमशाळेत” उपक्रम)

भाजपाचा विस्तार वेगाने सुरू

राज्यातील कामगार, कर्मचारी आणि तरुणाई भाजपाच्या विकासोन्मुख धोरणांवर आणि प्रगतीशील नेतृत्वावर विश्वास ठेवत आहे. इंडिगो कर्मचाऱ्यांचा पक्षप्रवेश हा महाराष्ट्रातील भाजपाच्या (BJP) वाढत्या जनाधाराचा आणखी एक पुरावा आहे.

“कामगार, कर्मचारी आणि सर्वसामान्य जनतेसाठी भाजपाच योग्य पर्याय आहे,” असे मत नव्याने पक्षप्रवेश करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.

भाजपा म्हणजे स्थिरता, विकास आणि सुरक्षितता!

या पक्षप्रवेशामुळे महाराष्ट्रात भाजपाची (BJP) ताकद आणखी वाढली असून, आगामी निवडणुकांमध्ये भाजपाच सर्वोच्च स्थान गाठेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.