अजित पवारांच्या डोळा मारण्यावर अनिल बोंडे म्हणाले, ‘जर बाळासाहेब ठाकरे असते तर….’

286

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी, ९ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला. त्यानंतर अर्थसंकल्पाबरोबरच विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या एका कृतीबद्दल चांगलीच चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे अर्थसंकल्पावर बोलत असताना अजित पवारांनी डोळा मारलेला व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आणि याच्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या. आता याबाबत भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

‘देशात आता डोळा मारणारे दोन जण झालेत’

नागपूर पत्रकार परिषदेत बोलत असताना अनिल बोंडे म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे अर्थसंकल्पाच्या विरोधात बोलत असताना अजित पवारांनी डोळा मारला. मात्र, ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना काही वाटलं नाही. आपल्या नेत्याचा अपमान झाला आणि काहीच वाटलं नाही. जर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर कोणी डोळा मारू शकलं असतं का? त्यांची खिल्ली उडवावी. देशात आता डोळा मारणारे दोन जण झालेत. एक अजितदादा आणि दुसरे राहुल गांधी.’

तसेच पुढे अनिल बोंडे म्हणाले की, अवकाळी पावसानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान होते. तेव्हा महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांना काहीच दिलं नव्हतं. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारनं मागच्या वेळी एनडीआरएफच्या नियमांपेक्षा जास्त मदत केली. आतासुद्धा पंचनामे करण्याचे आदेश दिले. नुकसान भरपाई देण्यात येईल. शेतकरी आत्महत्या होत आहेत, हे थांबविण्यासाठी त्यांचं उत्पादन वाढविण्यासाठी मोदी सरकारने प्रयत्न केला. त्याला यश येत आहे.

(हेही वाचा – ठाकरेंची शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीने विकत घेतली; दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.