‘लव्ह जिहाद’प्रकरणी संसदेत विधेयक आणणार – अनिल बोंडे

114

देशात वाढत्या लव्ह जिहादच्या प्रकरणी देशपातळीवर एकच कायदा होणे गरजेचे आहे, त्यामुळे संसदेत लव्ह जिहादप्रकरणी कायदा करण्यात यावा, त्यासाठी संसदेत विधेयक आणणार असल्याची माहिती भाजपाचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.

खासगी विधेयकाद्वारे करणार मागणी 

दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये बोलताना अनिल बोंडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, राज्यात सध्या ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे मोठ्या प्रमाणात बाहेर येत असून यासंदर्भात येत्या अधिवेशनात विधेयक आणणार आहे. तसेच आंतरधर्मीय विवाह कायद्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. ‘लव्ह जिहाद’ हे एक सुनियोजित कटकारस्थान ‘लव्ह जिहाद’ हे एक सुनियोजित कटकारस्थान आहे. अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्याकांडनंतर ज्या आरोपीला पडकण्यात आले, त्याचाही लव्ह जिहाद प्रकरणात हात होता, हे सिद्ध झाले. मेळघाटातील आदिवासी मुलींना फसवून पळवून आणले जाते. मुलींना विरोध केला तर मुलींना जीवही गमवावा लागतो. अशाच प्रकारची एक घटना चिखलदरा तालुक्यातून समोर आली आहे. ही मुले महाविद्यालयासमोर उभे राहून मुलींवर लक्ष ठेवतात. फेसबुकच्या माध्यामातून मुलींशी संपर्क केला जातो. हे सर्व सुनियोजितपणे सुरू असते, असे अनिल बोंडे यांनी सांगितले. लव्ह जिहाद संदर्भात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच येत्या अधिवेशनात याबाबत खासगी विधेयक मांडून कायदा करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करणार आहे, असेही खासदार बोंडे म्हणाले.

(हेही वाचा Vedanta-Foxconn Project : अग्रवालांच्या ट्विटनंतर भाजपाचा राष्ट्रवादीवर पलटवार )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.