भाजपचे उत्तर प्रदेश येथील खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौ-याला जौरदार विरोध केला आहे. यावरुन मनसैनिकांमध्ये नाराजी असतानाच, सिंह यांनी आता राज ठाकरे यांच्या विरोधात उत्तर भारतीयांना सामूहिक शपथ दिली आहे.
सिंह यांनी दिली शपथ
जोपर्यंत राज ठाकरे हे हात जोडून उत्तर भारतीयांनी माफी मागावी. त्यांनी असे न केल्यास आम्ही लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरुन त्यांना अयोध्येत शिरु देणार नाही, अशी शपथ सिंह यांनी उत्तर प्रदेशातील उत्तर भारतीयांना दिली आहे. उत्तर भारतीयांचा अपमान हा हिंदुस्थान सहन करणार नसल्याचा नाराही त्यांनी लगावला आहे.
(हेही वाचाः राज ठाकरेंना आव्हान देणा-या भाजप खासदाराने अनेकांना ‘असमान’ दाखवलं आहे)
कोण आहेत ब्रिजभूषण सिंह?
भाजपचे ब्रिजभूषण सिंह हे उत्तर प्रदेशच्या केसरगंज लोकसभा मतदारसंघातले खासदार आहेत. पण याआधी ते गोंडा मतदारसंघातून एकदा दोनदा नाही तब्बल सहा वेळा ते लोकसभा खासदार म्हणून निवडून आले आहेत. उत्तर प्रदेशच्या गोंडा मतदारसंघात ब्रिजभूषण सिंह यांनी झेंडा गाढला आहे. राजकीय आखाडे गाजवणा-या ब्रिजभूषण यांनी राजकारणात येण्याआधी कुस्तीचे आखाडेही गाजवले आहेत. मातीतला पहलवान म्हणून ओळख असणा-या ब्रिजभूषण यांनी याआधी अनेकांना असमान दाखवलं आहे. त्यामुळे आपल्या प्रतिस्पर्ध्यांविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन करणं हे काही सिंह यांच्यासाठी नवीन नाही.
Join Our WhatsApp Community