भाजपचे ज्येष्ठ नेते व पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. त्यांच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट आजारी आहेत. या पार्श्वभूमीवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांनी हेल्थ बुलेटीन काढून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.
( हेही वाचा : जनतेला केव्हा, कोणत्या वेळेत भेटणार ते फलकावर लिहा! महिलेच्या आत्महत्येनंतर मुख्यमंत्र्यांचे निर्देश )
गिरीश बापट यांच्यावर सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. गिरीश बापट यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. दुपारी दोन वाजल्यानंतर गिरीश बापट यांच्या प्रकृतीविषयी आणखी सविस्तर माहिती देण्यात येईल असे रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
गिरीश बापट यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. परंतु त्यांच्यांवर घरीच उपचार सुरु होते. बुधवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुण्यातील राजकारणात गिरीश बापटांचा दबदबा होता परंतु गेल्या काही वर्षांपासून गिरीश बापट यांनी दुर्धर आजाराची लागण झाल्यामुळे ते राजकारणापासून दूर होते.
Join Our WhatsApp Community