खासदार गोपाळ शेट्टींची वेबसाईट पाकड्यांकडून हॅक!

याआधी गृहराज्य मंत्री किसन रेड्डी यांचीही वेबसाईटही हॅक झाली होती.

पाकिस्तानातील दहशतवादी संघटना अथवा पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या भारतातील काही छोट्या-मोठ्या दहशतवादी संघटना ह्या अधूनमधून दहशतवादी कारवायांद्वारे दहशतवाद पसरवत असतात. अशा संघटना भारतातील सरकारी आस्थापने, मोठ्या कंपन्या, बॅंका यांच्या वेबसाईट हॅक करून सायबर क्षेत्रातही दहशतवाद पसरवतात. अशाच प्रकारे लोकप्रतिनिधींचीही वेबसाईट हॅक करत असतात. त्यानुसार भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांचीही वेबसाईट हॅक करण्यात आली आहे.

हॅकरने काय म्हटले आहे या वेबसाईट्वर?

http://gopalshetty.com/ अशी खासदार गोपाळ शेट्टी यांची वेबसाईट आहे. ही वेबसाईट उघडताच त्यावर ‘गोपाळ शेट्टी (भाजप) हॅक’ असे लिहिलेले दिसते. त्यानंतर ‘मोदी इंतजार कर कुत्ते, तेरा बाप भी पाकिस्तान और आयएसआय को याद रखेगा, अब हमारी बारी’ पाकिस्तान जिंदाबाद [email protected], Muhammad Bilal [TEAM PCE] असा संदेश त्यामध्ये देण्यात आला आहे.

(हेही वाचा : राहुल गांधींना आरोग्य मंत्र्यांनी दिला ‘बूस्टर डोस’! म्हणाले, त्यांना काही समजत नाही)

याआधी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांची वेबसाईट हॅक झालेली!

भाजपचे दक्षिण मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी सध्या मतदार संघात फिरून लोकांच्या भेटीगाठी करत आहेत. पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यावर ते नेहमी कडक शब्दांत निषेध नोंदवतात. त्यामुळे ते पाकिस्तानी दहशतवादी संघटनांच्या रडारवर आहेत. आम्ही गोपाळ शेट्टी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही. लोकप्रतिनिधींची वेबसाईट हॅक होणे ही पहिली वेळ नाही. याआधी गृहराज्य मंत्री किसन रेड्डी यांचीही वेबसाईटही हॅक झाली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here