तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी संसदेच्या अधिवेशनात प्रश्न विचारण्यासाठी एका उद्योजकाकडून लाच स्वीकारली, असा गंभीर आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी रविवारी केला. या आरोपांची खातरजमा करण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना करावी, अशी विनंती त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना केली. डिसेंबर २००५ मध्ये अनेक खासदारांनी आर्थिक मोबदल्यात संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप यापूर्वीच झाला आहे. मोइत्रा यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. (Mahua Moitra)
निशिकांत दुबे म्हणाले, “संसदेत प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा लाच घेतात. मोईत्रा यांनी अदाणी समूहावरून संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले होते”. झारखंडचे भाजपा नेते निशिकांत दुबे यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना याबाबत निवेदन दिलं आहे. दुबे यांनी निवेदनात म्हटलं आहे की महुआ मोईत्रा यांनी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेऊन संसदेत अदाणी समूहावरून प्रश्न उपस्थित केले होते. संसदेत अदाणींवरून प्रश्न विचारून मोईत्रा यांनी हिरानंदांनी यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता.
निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे महुआ मोईत्रा यांना लोकसभेतून निलंबित करण्याची मागणी केली आहे. दुबे यांच्या तक्रारीबद्दल महुआ मोईत्रा म्हणाल्या, अशा तक्रारीनंतर कुठल्याही प्रकारचा तपास किंवा चौकशी होणार असेल तर मी त्याचं स्वागत करते.
(हेही वाचा : Nana Patole : सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसच आरक्षणाचा प्रश्न सोडवेल)
मोइत्रा यांनी याप्रकारे प्रश्न विचारून हक्कभंग, सभागृहाचा अवमान या गुन्ह्यांसह फौजदारी गुन्हाही केला आहे, असे दुबे यांनी म्हटले आहे. दरम्यान, मोइत्रा यांनी या आरोपांचे खंडन केले. दुबे यांच्याविरोधातील प्रलंबित चौकशी पूर्ण झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी माझ्यावर काहीही कारवाई करावी, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community