गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरू असून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड ठाकरे सरकारवर भारी पडणार असल्याची सध्याची राजकीय परिस्थिती दिसतेय. सरकार अल्पमतात आले असून आपल्याकडे जास्त आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, कोणाचे सरकार राज्यात असेल आणि यंदाची महापूजा कोणाच्या हस्ते होणार यावर भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
(हेही वाचा – एकनाथ शिंदे पहिल्यांदाच हॉटेलबाहेर, सत्तास्थापनेबाबत केलं मोठं विधान )
महापूजा फडणवीसच करणार
नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे आज, मंगळवारी श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन करण्यासाठी पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांना आषाढीची महापूजा कोणाच्या हस्ते होणार असे विचारले असता त्यांनी देवेंद्र फडणवीस हे पूजा करतील, असे उत्तर दिले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस होऊदे आणि त्यांच्या हस्तेच महापूजा होऊदे असे विठुरायाकडे साकंड घातल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दोन-तीन दिवसात राज्यात भाजपचे सरकार
राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असताना नवं सरकार येणार की नाही, अशी चर्चा सुरू असतानाच भाजपचे खासदार चिखलीकर यांनी मोठी माहिती दिली आहे. येत्या दोन-तीन दिवसात राज्यात भाजपचे सरकार येईल, शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आणि सोबतचे बंडखोर आमदार यांच्या मदतीने भाजप सत्तेत येईल, त्यांच्यासोबच शिवसेनेचे १० ते १२ खासदार सोबत येतील असा गौप्यस्फोट देखील चिखलीकर यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंनी हिंदुत्वाच्या मुद्दावर बंड केले आहे. 55 पैकी 40 च्यावर आमदार त्यांच्यासोबत आहे. मतदारसंघामध्ये विकास व्हावा ही सगळ्यांची इच्छा आहे. केंद्रामध्ये भाजपचे सरकार आहे. राज्यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपचे सरकार आले तर विकासाची कामे होतील. या भावनेतून किमान 10 ते 12 खासदार शिंदे यांच्यासोबत निश्चित जातील, असं वाटतं. आपल्या मतदारसंघात विकास व्हावा. त्यासाठी ते शिंदेंच्या संपर्कात आहेत, असेही चिखलीकर यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community