मोदींचा ‘हा’ गुण आपल्याला सर्वात जास्त आवडतो… काय म्हणाल्या प्रीतम मुंडे?

जो माणूस प्रामाणिकपणे आपलं काम करतो, कर्तव्य निभावतो, तो केवळ आपल्या मार्गावर मार्गक्रमण करत राहतो.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे समर्थक चांगलेच नाराज झाले होते. त्यावेळी मुंडेंच्या दोन्ही कन्या पक्षाच्या या निर्णयावरुन नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. पण आता भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. मोदींचा पत्रकार परिषद न घेण्याचा गुण आपल्याला सर्वाधिक आवडतो, असे प्रीतम मुंडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुंडे कन्यांच्या नाराजीच्या चर्चांना आता एकप्रकारे विराम लागल्याचे दिसून येत आहे.

(हेही वाचाः प्रणिती शिंदेंना मिळणार कॅबिनेट मंत्रीपद?)

काय म्हणाल्या प्रीतम मुंडे?

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांनी मोदींचा आपल्याला आवडणा-या गुणाबाबत विधान केले आहे. गेल्या सात वर्षांत मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. याबाबत त्यांना अनेकदा टीकेलाही सामोरे जावे लागले. पण जो माणूस प्रामाणिकपणे आपलं काम करतो, कर्तव्य निभावतो, तो केवळ आपल्या मार्गावर मार्गक्रमण करत राहतो, असे प्रीतम मुंडे म्हणाल्या.

(हेही वाचाः भाजपा नेत्यांच्या रोमारोमांत ‘मराठीद्वेष’! राऊतांचा रोखठोक वार)

राष्ट्रवादीच्या आमदारांवर साधला निशाणा

या कार्यक्रमादरम्यान प्रीतम मुंडे यांनी रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन धनंजय मुंडेंसह स्थानिक आमदारांचा नाव न घेता चांगलाच समाचार घेतला. राष्ट्रवादीचे काही आमदार रस्त्यांवर खड्डे पडले की केंद्रातील भाजपा खासदारांकडे बोट दाखवतात. पण खासदारांनी दुरुस्तीसाठी निधी आणला की तो आपण आणल्याचे दाखवत मिरवतात. रस्त्यांच्या कामांचा पाठपुरावा कोण करत आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे अशाप्रकारे दोन्ही बाजूंनी बोलणा-या लोकांना जनता त्यांची जागा नक्कीच दाखवेल, असा झणझणीत टोला प्रीतम मुंडे यांनी लगावला.

(हेही वाचाः आधी बैलगाडा शर्यत आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी पडळकर मैदानात)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here