अभिनेते आणि भाजप खासदार रवी किशन यांची फसवणूक, 3.25 कोटी रुपयांचा घातला गंडा

92

अभिनेते आणि गोरखपूरचे भाजप आमदार रवी किशन यांची मोठी फसवणूक झाल्याची माहिती मिळत आहे. एका बिल्डरने रवी किशन यांना 3.25 कोटींचा गंडा घातल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान रवी किशन यांच्या तक्रारीवरुन गोरखपूरच्या कँट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

रवी किशन यांची फसवणूक

रवी किशन यांनी 2021 मध्ये मुंबईतील रहिवाशी जितेंद्र रमेश जैन यांना 3.25 कोटी रुपये दिले होते. जेव्हा रवी किशन यांनी पैसे परत करण्यास सांगितले तेव्हा जैन याने किशन यांना 34 लाखांचे 12 चेक दिले. रवी किशन यांनी 7 डिसेंबर 2021 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया येथील गोरखपूर शाखेत 34 लाखांचा चेक जमा केला असता तो बाऊन्स झाला. सातत्याने पैशांसाठी तगादा लावून सुद्धा पैसे परत करण्यात येत नसल्यामुळे रवी किशन यांनी अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांकडून तपास

दरम्यान, रवी किशन यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत असल्याचे कँट पोलिस ठाण्याचे अधिकारी शशी भूषण यांनी सांगितले. रवी किशन हे भाजपचे गोरखपूर येथील खासदार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.