बॉलिवूडला लागला ड्रग्सचा नाद, संसदेतही गाजला मुद्दा

127

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आले आणि बॉलिवूडमधील कलाकरांचा खरा चेहरा पुन्हा एकदा जनतेसमोर आला. मुंबईमधील ड्रग्स कनेक्शनचा मुद्दा राज्याच्या पावसाळी अधिवेशनात गाजलेला असतानाच आता संसदेत देखील हा मुद्दा चर्चेला आला आहे. भाजपा खासदार रवी किशन यांनी संसदेच्या आज पासून सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरला.

काय म्हणाले रवी किशन

देशामध्ये ड्रग्स तस्करीची समस्या वाढली असून, देशातील तरुण पिढीला बरबाद करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. भारताच्या शेजारील देशांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असून, पाकिस्तान आणि चीनमधून ड्रग्सची तस्करी होत आहे. पंजाब आणि नेपाळ मार्गाने देशात ड्रग्स पोहोचवला जात आहे. तसेच बॉलिवूडमध्ये ड्रग्सने शिरकाव केला असून, काहींवर एनसीबीने कारवाई देखील केली आहे. त्यामुळे मी केंद्र सरकारला विनंती करतो की, यातील दोषींवर कारवाई लवकरात लवकर व्हावी असे रवि किशन संसदेत म्हणाले.

हेही वाचाबॉलिवूडची नशेमन नशेबाज!

रियाचा जामीन अर्ज फेटाळला

विशेष बाब म्हणजे रियाने अटकेनंतर दुसऱ्यांदा जामिनासाठी अर्ज केला होता. अटक झाल्यानंतर न्यायालयाने तिला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्या वेळी तिने जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो देखील फेटाळला. विशेष न्यायालयाने रिया आणि शोविकसह अब्दुल बसित, झैद विलात्रा, दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांचाही जामीन अर्ज फेटाळला आहे.

पार्टीमध्ये बोलवून मला ड्रग्स देण्याचा प्रयत्न व्हायचा

दरम्यान अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने देखील पार्टीमध्ये बोलावून मला ड्रग्स देण्याचा प्रयत्न व्हायचा असे सांगत सिनेसृष्टीतील काही मंडळींनी मला जबरदस्तीने ड्रग्स देण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगितले. तसेच मला धुम्रपानाचे व्यसन होते. परंतु ऑक्टोंबर २०१७ मध्ये मी धुम्रपान करणे कायमचे सोडले. मी कधीतरी मद्याचे सेवन करते. परंतु ड्रग्स कधीही घेतलेले नाहीत. सिनेसृष्टीतील काही मंडळी मला ड्रग्स घेण्यासाठी जबरदस्ती करायचे. मी मात्र त्यांना कायम नकार दिल्याचे शर्लिन चोप्रा आपल्या इन्स्टावर म्हणाली.

रियाने घेतले ‘सारा’ चे नाव 

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने ड्रग्स कनेक्शनमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला बॉलिवूडमधील २५ कलाकारांची यादी दिली असून, यामध्ये तिने सैफ अली खानची मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खान हिचे नाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रियाने अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची देखील नावे घेतल्याची माहिती मिळत आहे. रियाने एनसीबीला दिलेल्या १९ पानी निवेदनात सारा, रकुल आणि सिमॉन या तिघींची नावे दिली आहेत. एनसीबी आता फिल्म इंडस्ट्रीच्या ए, बी आणि सी ग्रेड कलाकारांवर लक्ष केंद्रीत करत आहे, जे अमली पदार्थांचे सेवन करतात. या प्रकरणात २५  ए ग्रेड बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे घेण्यात आली आहेत, ज्यात अभिनेते, दिग्दर्शक, कास्टिंग डायरेक्टर, प्रॉडक्शन हाऊस आणि इतरांचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.