मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाज प्रचंड अस्वस्थ आहे. त्यामुळे आरक्षणासाठी तुम्ही पुढाकार घेण्याची गरज आहे, असे आवाहन भाजपचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केले.
मराठा समाज अस्वस्थ!
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यावर मराठा समाजामध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. त्यामुळे आपण राज्यभर दौरा केल्यावर गुरुवार, २७ मे रोजी सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. त्या बैठकीत आपण या संबंधी मराठा समाज किती अस्वस्थ, दुःखी आहे, हे सांगितले. त्यामुळे पवारांनी आता मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती आपण त्यांना केली आहे. ही बैठक सकारात्मक झाली आहे. उद्या, शुक्रवारी, २८ मे रोजी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे, तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहे, त्यानंतर आपण आपली भूमिका पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार आहे, असेही खासदार संभाजी राजे म्हणाले.
(हेही वाचा : मुंबईतील एका उड्डाणपुलाने चढली कोट्यावधींची ‘शिडी’)
बैठकीपूर्वी अजित पवार, जयंत पाटील निघाले!
ही बैठक शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यावर झाली. तत्पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांना भेटले. मात्र त खासदार संभाजी राजे यांच्या बैठकीच्या वेळी उपस्थित नव्हते.
Join Our WhatsApp Community