BJP: महापालिका निवडणूक स्वबळावरच? भाजपाचा बंडखोरांना संदेश

133
BJP: महापालिका निवडणूक स्वबळावरच? भाजपाचा बंडखोरांना संदेश
BJP: महापालिका निवडणूक स्वबळावरच? भाजपाचा बंडखोरांना संदेश
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुती सरकारमध्ये जागावाटप पूर्ण करून उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात बंडखोरीचा सामना तिन्ही पक्षांना करावा लागत आहे. या सर्व बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपाने काही प्रमाणात बंडोबांना शांत करतानाच आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत युतीमध्ये निवडणूक लढवली जाणार नाही अशाप्रकारचा संदेश दिला आहे. आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणूक भाजपा (BJP) स्वबळाबळावरच लढवील. जेणेकरून भाजपामधील प्रत्येक इच्छुक उमेदवाराला प्रत्येक जागेवर निवडणूक लढवता येईल आणि त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण होईल. त्यामुळे आज जरी विधानसभेत महायुती म्हणून निवडणूक लढवली जात असली तरी आगामी महापालिका निवडणुकीत युतीतील सर्व पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आपल्याला पाहायला मिळतील अशी दाट शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची महाविकास आघाडी तसेच शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जागा निश्चित होऊन उमेदवारांची अधिकृत घोषणा झाल्यानंतर प्रत्येक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. परंतु शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर भाजपाकडून इच्छुक उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत बंडखोरीचा इशारा दिला तर काही ठिकाणी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे महायुतीत जागा वाटपात आपल्या वाट्याला मतदार संघ येत नसल्याने भाजपाचे (BJP) पदाधिकारी प्रचंड नाराज झालेले आहेत.

(हेही वाचा – Shiv Sena UBT उमेदवाराचा ३०-वर्षीय कमावता मुलगा अवलंबीत?)

मात्र, यासर्वांना शांत करण्यात काही प्रमाणात भाजपाच्या नेत्यांना यश येत असून जिथे नेत्यांकडून संभाषण झालेले नाही तिथे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. त्यामुळे या अपक्षांची मनधरणी करत त्यांना शांत करताना भाजपाच्या (BJP) नेत्यांकडून महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत ही युती नसेल, भाजपा (BJP) स्वबळावर ही निवडणूक लढवेल असे सांगितले जात आहे. त्यामुळे बंडखोरांचे समाधान होत आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजपाच्या माहीम तालुका अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांनी फेसबूकवर पोस्ट करत बचेंगें तो लढेंगें, नहीं तो तूट जायेंगें असे म्हटले होते. त्यांनी या पोस्टमध्ये असे म्हटले होते की, पक्षाला कळकळीची विनंती आहे की, आगामी काळात महानगरपालिका, जिल्हापरिषदा, पंचायत किंवा इतर स्थानिक स्वराज्य निवडणूका आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी स्वबळावर लढायला हवीच हवी … कार्यकर्त्यांचा football सारखा वापर करू नका. माहिम विधानसभेमध्ये ३ वार्ड तर आम्ही नक्कीच जिंकूच जिंकू … फक्त नेत्यांच्या मुला – मुलींना सेट करण्यासाठी संघटनेची परवडकरु नका, वाट लावू नका.असे म्हटले होते. मात्र, आता हीच भाषा भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून काही बंडखोरांना ऐकायला मिळत आहे. महापालिकेची निवडणूक स्वबळावरच लढली जाईल असे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजपा महापालिकेत स्वबळावर लढवल्यास सन २०१७ प्रमाणे त्यांना आपली ताकद पुन्हा एकदा दिसून येणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.