राऊतांना नेमका घाम कशामुळे फुटला? राणेंचा हल्लाबोल

110

मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी भाजपवर चांगलाच निशाणा साधला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करत बुधवारी प्रत्युत्तर देण्यासाठी नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली. राऊतांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत संजय राऊतांची केविलवाणी परिस्थिती झाली आणि त्यांना घाम नेमका कशामुळे फुटला असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला. यावेळी ते म्हणाले, हा घाम विरोधकांमुळे फुटला की चुकीच्या कृत्यामुळे त्यांना फुटला. हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद घेत आहे. मर्दाची शिवसेना आहे आणि ते वारंवार सांगायची गरज नाही. मर्द माणसाला हे सांगायची गरज नाही. जो घाबरतो तोच वारंवार सांगतो मी कोणाला घाबरत नाही, असा घाणाघात नारायण राणेंनी संजय राऊत यांच्यावर केला.

काय म्हणाले नारायण राणे

नारायण राणे पुढे असेही म्हणाले की, संजय राऊतांनी कोणावर आरोप करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकार परिषदेला राज्यभरातील शिवसेनेचे कार्यकर्ते, मंत्री, नेते येणार असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु साधे विभाग प्रमुख, मुंबईचे प्रमुख नेते, मंत्री, आमदार, पदाधिकारी, पक्षाचे प्रमुखसुद्धा उपस्थित नव्हते. केवळ नाशिकमधील काही मोजके लोकं दिसत होते. कारण ते नाशिकमधील संपर्क प्रमुख आहेत म्हणून तिकडून लोकं आणले होते.

(हेही वाचा – सेनेचे डबेवाला भवनाबाबतचे ‘वचन’ नही बने शासन!)

स्वतः अडचणीत होते म्हणून पत्रकार परिषद घेतली ?

शिवसेनेसाठी पत्रकार परिषद घेतली की, स्वतः अडचणीत होते, म्हणून ती घेतील हा एक मुद्दा नारायण राणेंनी यावेळी उपस्थितीत केला. इतके दिवस सेना भवन आठवले नाही. भगवी शाल पांघरूण जसं काय राऊतच शिवसेना प्रमुख हेच बनले आहेत अशा आवेशात बसून राऊतांनी कालची पत्रकार परिषद घेतली आणि त्याच पत्रकार परिषदेत काय शब्द उच्चारले, शिरवाळ भाषा वापरणे म्हणजे शिवसेनेची मर्दानगी नव्हे, एका वृत्तपत्राचे संपादक म्हणून असे शब्द वापरणे अयोग्य आहे, असे म्हणत राणेंनी राऊतांवर निशाणा साधला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.