“तुझ्या सुपाऱ्याही काही काम करू शकल्या नाही”, नारायण राणेंचा संयम सुटला अन् …

145

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या झालेल्या जोरदार भाषणावर नारायण राणेंनी तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत राणेंनी ठाकरेंचा एकेरी भाषेत उल्लेख करून भाजपवर केलेल्या टीकेवर वचपा काढला आहे.

यावेळी नारायण राणे म्हणाले, मनोहर जोशींना ज्या मंचावर बसवले होते, त्या मनोहर जोशींच्या घरावर सदा सरवणकर यांना या लबाड उद्धव ठाकरेने हल्ला करायला लावला होता. इतकेच नाही तर तुझ्या सुपाऱ्या देखील काही काम करू शकल्या नाहीत. शकील, छोटा राजनसह काही जणांना नारायण राणेंना मारा अशी सुपारी दिली होती. काय झालं अजून मी जीवंत आहे, उद्धव ठाकरे मी पुरून उरेल, असे म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिले.

(हेही वाचा – अरबी समुद्रातील शिवस्मारकाची एकही वीट न रचता २५ कोटींचा खर्च )

पत्रकार परिषदेच्या वेळी बोलताना राणे म्हणाले, देशाची कायदा सुव्यस्था बिघडवण्याचे काम करू नका आणि काही झाले तरी उद्धव ठाकरे जबाबदार असतील. थोडी तरी मर्यादा ठेवा. तुम्ही मंत्रालयात येऊ शकत नाही, २० मिनिटे हा माणूस चालू शकत नाही. त्याला सतत डॉक्टरांचा सल्ला लागतो. वाकायला पण डॉक्टर लागतो मग काम काय करणार?, असे म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

शिवसेनेचा मेळावा शिमग्यासारखा

उद्धव ठाकरेंनी शिव्याशाप देण्यासाठी हा मेळावा घेतला होता का, असा प्रश्न उपस्थित करत नारायण राणे म्हणाले,  उद्धव ठाकरेंच्या भाषणातून वैचारिक आणि बौद्धिक काहीच नव्हते परंतु, फक्त शिव्याच होत्या. यावेळचा शिवाजी पार्कचा दसरा मेळावा म्हणजे तमाशाकारांचा मेळावा होता. शिवसेनेचा मेळावा शिमग्यासारखा झाला. कारण शिमग्याला शिव्या द्यायचं काम होतं तसेच चित्र पवित्र शिवतीर्थावर पाहिला मिळाले.

उद्धव ठाकरे लबाड लांडगा

उद्धव ठाकरेंनी २०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव आणि फोटो लाऊन निवडणूक लढली आणि ती जिंकली. मात्र यानंतर आता मोदींवर टीका करण्यास सुरू केली आहे. या माणसाने हिंदूत्वाबद्दल काहीही बोलू नये, त्याचे हिंदूत्व बेगडी आहे. मोदींचे नाव सांगून त्याने आमदार निवडून आणले. उद्धव ठाकरे लबाड लांडगा आहे, असे म्हणत त्यांच्याप्रती नारायण राणेंनी नाराजी व्यक्त केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.