भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक; ९ राज्यांच्या विधानसभा निवडणुका लक्ष्य

133

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सोमवारी, १६ जानेवारी रोजी देशात आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये आधी ९ राज्यांत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका टार्गेट करण्याचा निर्णय घेण्यात आला. या  बैठकीत पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आगामी विधानसभा निवडणुकांवर भाष्य केले.

हिमाचलमधील पराभवावरही बैठकीत चर्चा   

या बैठकीत लोकसभेच्या २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीवरही चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत विजय नोंदवायचा असेल, तर त्याची सुरुवात या वर्षी होणाऱ्या ९ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपासून करावी लागेल, यावर जोर देण्यात आला आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत जेपी नड्डा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे जगभरात भारतीय लोकांचा आदर वाढला आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका होतात, तिथे पक्ष संघटनेत जो काही बदल करत असतो, त्याचे परिणाम निवडणुकीच्या निकालात दिसायला हवेत. बैठकीनंतर रविशंकर प्रसाद यांनीही अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली आहे. कमकुवत बूथ मजबूत करण्यासाठी ७२ हजारांची ओळख पटवली. लोकसभेचे १०० आणि विधानसभेचे २५ बूथ ओळखले गेले आहेत. हिमाचलमधील पराभवावरही बैठकीत चर्चा झाली.

(हेही वाचा चित्रा वाघ यांचा उर्फीला विरोध; टार्गेट मात्र रुपाली चाकणकर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.