महायुतीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या भाजपाने (BJP) विधानसभेच्या जागावाटपात १४८ मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. मात्र भाजपाचे (BJP) तब्बल १७ उमेदवार शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) (अ.प) यांच्या एबी फॉर्मवर विधानसभा लढवत आहेत. त्यामध्ये शिवसेनेत १२ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ४, तर ‘रिपाई’ च्या एका मतदारसंघाचा समावेश आहे. (BJP)
दरम्यान मित्रपक्षांच्या मतदारसंघात आपले १७ उमेदवार निवडणुकीत उभे करताना भाजपाने आपल्या मित्रपक्षातील एकही उमेदवाराला स्विकारलेले नाही. त्यात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे १४८, शिवसेनेचे (Shiv Sena) ८० तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे ५२ उमेदवार रिंगणात आहेत.
भाजपाच्या (BJP) १२ उमेदवारांच्या हाती ‘धनुष्यबाण’
भाजपाने (BJP) मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला (Shiv Sena) १२ जागांवर उमेदवार दिले असून यामध्ये नीलेश राणे (मालवण कुडाळ), संजना जाधव दानवे (कन्नड), राजेंद्र गावित (पालघर), विलास तरे (बोईसर), संतोष शेट्टी (भिवंडी पूर्व), मुरजी पटेल (अंधेरी पूर्व), शायना एनसी (मुंबादेवी), अमोल खताळ (संगमनेर), अजित पिंगळे (धाराशिव), दिग्विजय बागल (करमाळा), विठ्ठल लंघे (नेवासा), बळीराम शिरसकर (बाळापूर) हे शिवसेनेच्या (Shiv Sena) धनुष्यबाण चिन्हावर निवडणुक लढवणार आहेत.
भाजपाच्या (BJP) ४ उमेदवारांच्या हाती ‘घड्याळ’
भाजपाने (BJP) मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) (अजित पवार ) गटाला ४ उमेदवार विधानसभेसाठी दिले असून यामध्ये राजकुमार बडोले (अर्जुनी मोरगाव), प्रताप पाटील- चिखलीकर (लोहा- कंधार), निशिकांत पाटील (चाळवा- इस्लामपूर) आणि संजयकाका पाटील (तासगाव महाकांळ) हे अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर निवडणुक लढवणार आहेत.
दरम्यान रामदास आठवले यांच्या “रिपाईला भाजपने (BJP) मुंबईतील कलिना मतदारसंघ सोडला असून इथून मुंबई भाजपचे उपाध्यक्ष अमरजीत सिंह निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र त्यांनी रिपाईचा एबी फॉम उमेदवारी अर्जासोबत जोडलेला नसून ते भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तसेच महादेव जानकर यांच्या ‘रासप’ला भाजपाने (BJP) गंगाखेडची एक जागा सोडली आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community