आता राऊतांनंतर पुढचा नंबर उद्धव ठाकरेंचा? निलेश राणेंचं सूचक वक्तव्य

मुंबईतील गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यामुळे राऊत यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. हा सगळा घाणेरड्या राजकारणाचा डाव असल्याचा आरोप संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे भाजपने देखील या आरोपांचे जोरदार खंडण केले आहे. भाजप नेते निलेश राणे यांनीदेखील उडी घेतली आहे. यांनी ट्वीट करत राऊतांना टोला लगावला आहे.

(हेही वाचा – ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातही पावसाची मुंबईकरांकडे पाठ; हवामान खात्याचा अंदाज)

काय घडला प्रकार

रविवारी संजय राऊत घरातून बाहेर पडताच त्यांचे कुटुंबीय भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर त्याचा व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये संजय राऊत यांच्या आईंनी त्यांचे औक्षण केले आणि राऊतांनी देखील यावेळी त्यांचे चरणस्पर्श केले आणि आशीर्वाद घेतला. राऊतांनी त्यांना घट्ट मिठी मारली.  राऊतांना ईडीने ताब्यात घेतल्यावर संजय राऊतांच्या आईचे अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले, यावर भाजपचे निलेश राणेंनी निशाणा साधला आहे.

काय म्हणाले निलेश राणे

दुसऱ्यांच्या घरात पण आई असते, मागच्या अडीच वर्षात दुसऱ्यांच्या आईंना किती त्रास दिला ठाकरे सरकारने हे संजय राऊत विसरता कामा नये. हेच उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला पण लागू होते, कारण पुढचा नंबर त्यांचा असू शकतो, असे सूचक वक्तव्य निलेश राणेंनी ट्वीट करत केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here