आगामी अंधेरी पूर्व विधानसभेची निवडणूक ही गेल्या काही दिवसात ठाकरे गटस शिंदे गट आणि भाजप यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. आमचाच उमेदवार विजयी होणार असा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. भाजपकडून देखील या पोट निवडणुकीसाठी मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह मातोश्रींवर चांगलाच हल्लाबोल केला.
दिवस-रात्र जनतेची कामं करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला, जनसेवा करणाऱ्या व्यक्तीला भाजपने उमेदवारी दिली आहे. आणि अर्ज भरण्याच्यावेळी ही झालेली गर्दी म्हणजे मुरजी पटेल यांच्या कामाची पोहोचपावती आहे. मला विश्वास आहे की, जसं आता वातावरण दिसतंय तसंच निवडणूक झाल्यावरही दिसेल, असे नितेश राणे म्हणाले.
(हेही वाचा – Video: पंतप्रधान मोदींच्या आईबाबत ‘आप’च्या नेत्याने केलं आक्षेपार्ह विधान; भाजप आक्रमक)
पुढे बोलताना नितेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. ज्यांना स्वतःचा पक्ष वाचवता आला नाही, पक्ष चिन्ह वाचवता आले नाही. वडिलांच्या आजारपणावेळी आदित्य ठाकरे बाहेरगावी पार्ट्या करत होते. हे सर्व एकदा बाहेर आल्यावर कोणाला सहानुभूती मिळतेय हे दिसेल. आता उद्धव ठाकरे हे लटके कुटुंबीयांबाबत बोलताय… जेव्हा रमेश जिवंत होते, त्यावेळी अंगणेवाडीच्या प्रवासादरम्यान स्वतः रमेश लटकेंनी मला सांगितले की, त्यांना किती मानसिक त्रास होता. उद्धव ठाकरे त्यांना भेटायला तयार नव्हते. त्यांचे फोन मातोश्रीवर उचलण्यात येत नव्हते, असा आरोपही नितेश राणेंनी ठाकरेंवर केला.