संजय राऊत यांना सांगा की तुम्हाला गावी जायचे असेल तर जा, आम्ही ट्रेन बुक केली आहे. तीन सीट बाकी ठेवल्या आहेत. तुम्हाला जायची तिकीट आम्ही देतो अशी टीका भाजपचे आमदार नीतेश राणे (BJP Nitesh Rane )यांनी केली आहे.
दरम्यान आमदार नीतेश राणे म्हणाले की, मुंबई गोवा महामार्गावरून राजकारण तापलेले असताना खासदार संजय राऊत यांनी देखील सरकारवर टीका केली होती. त्यांच्या टीकेला भाजप आमदार नीतेश राणे यांनी उत्तर दिले. आमदार नीतेश राणे म्हणाले की, यापूर्वी आम्ही सहा ट्रेन सोडल्या आहेत. आम्ही २५० बसेस सोडतोय, रेल्वे गाड्या सोडतोय, गणपतीच्या काळात आम्ही या सेवा देतोय. टीका करणाऱ्यांनी किमान ट्रेन सोडून दाखवाव्यात. त्यांना गावी जायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव सीट ठेवली आहे.
आदित्य ठाकरेंवर नाव न घेता टीका
आमदार नीतेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावरही नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, पेंग्विन जर कोकणात येत असेल तर लोकांनी किमान घरात चार एसी लावाव्यात. कारण पेंग्विन एसी शिवाय जगू शकत नाही.
(हेही वाचा : Asia Cup 2023 : तब्बल २३ वर्षांनी भारताने काढला श्रीलंकेचा वचपा)
जाधवांवरही टीका
आमदार नीतेश राणे म्हणाले की, भास्कर जाधव यांना आमच्याकडे सोंगाड्या म्हणतात, याची जुनी भाषणे किंवा वक्तव्य बघा ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना शिव्याच्या लाखोळ्या घालत होते. त्यांनी जर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात तोंड उघडले तर त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरु देणार नाही, असा इशारा भाजप आमदार नीतेश राणे यांनी दिला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community