… हे तर ढोंगी पर्यावरणवादी, नितेश राणेंचा ठाकरेंवर पलटवार

117

राज्यात गुरूवारी मोठी राजकीय घडामोड झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत नव्या बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई मेट्रोचे कारशेड आरेमध्येच होण्यासंदर्भात राज्याच्या महाधिवक्त्यांना न्यायालयात बाजू मांडण्याचे निर्देश दिले. याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतला. यावर भाजपने उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पलटवार केल्याचे पाहायला मिळाले आहे. माजी मुख्यमंत्र्यांना जर मुंबईच्या पर्यावरणाचे एवढेच प्रेम होते तर त्यांनी स्वतःच्या पर्यावरण मंत्री मुलाने बांधलेला पवई सायकल ट्रॅक का नाही रोखला. हे तर ढोंगी पर्यावरणवादी असे म्हणत राणेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

(हेही वाचा – शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, उद्धव ठाकरेंचा निशाणा)

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भावनात पत्रकार परिषद घेऊन मुंबई मेट्रोच्या कारशेडबाबत नव्या सरकारने दिलेल्या निर्देशावरून नाराजी व्यक्त करत, आरेतच मेट्रोचे कारशेड करण्याचा विचार नवे शिंदे सरकारने केल्याने दुःख होत असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. तर आरेमध्येच कारशेड होण्याचा हट्ट धरू नका, असे आवाहन केले, यावरूनच नितेश राणे यांनी ट्विट करून निशाणा साधला आहे.

काय केले नितेश राणेंनी ट्विट

जर मुंबई आणि पर्यावरणावर खरेच प्रेम माजी मुख्यमंत्र्यांना असेल तर मग त्यांनी आपल्या पर्यावरण मंत्री असलेल्या मुलाला का थांबवले नाही, जो पवईमध्ये सायकलिंग ट्रॅक बनवत होता आणि मरीन ड्राइव्ह येथे व्ह्यूइंग गॅलरी बनवत होता ज्याने पर्यावरणाची हानी केली आहे. चॅरिटी घरातून सुरू होते माजी मुख्यमंत्री!! ढोंगी!, असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.