हनुमानाबद्दल सत्तारांचे आक्षेपार्ह वक्तव्य, व्हिडीओ व्हायरल करत नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

213

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा हनुमानाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करतानाचा व्हिडीओ भाजप आमदार नितेश राणे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट सवाल केला. नितेश राणे यांनी शेअर केलेला व्हिडीओ हा 2017 चा असून या व्हिडीओ वरुन त्यांनी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

नितेश राणेंचे  ट्वीट

अब्दूल सत्तार यांचा प्रभू हनुमानाच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा व्हिडीओ शेअर करत नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर हनुमानाचा अपमान करणा-या अब्दुल सत्तारांना अटक करा, असे म्हटले आहे. नितेश राणे यांनी अब्दुल सत्तार यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. अब्दुल सत्तारांवर टीका केली जात आहे. तसेच, भाजपाने सत्तारांवर कारवाईची मागणी केली आहे.

( हेही वाचा: पेट्रोल वाचवण्याच्या या भन्नाट टिप्स तुम्हाला माहिती आहेत का? )

सत्तार स्पष्टीकरण देतील?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हिंमत असेल, तर त्यांनी अब्दुल सत्तारांना तुरुंगात टाकावे असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे. यावर आता महाविकास आघाडीकडून काय उत्तर येते ते पाहावे लागेल. तसेच, स्वत: अब्दुल सत्तार काय भूमिका मांडतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.