महाराष्ट्राची कमान आता गडकरींच्या हाती! 

160

भाजपाला बाजूला सारून शिवसेनेने दोन्ही काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. अडीच वर्षानंतर मात्र महाराष्ट्रातील राजकारणात जोरदार उलथापालथ सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे. म्हणून राज्यात पुन्हा सरकार स्थापन करण्याच्या हालचाली भाजपात सुरु झाल्या आहेत. त्यासाठी भाजपच्या केंद्रीय पातळीवर नितीन गडकरी यांना समोर आणण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

गडकरी पुन्हा राज्यात सक्रीय

२०१९ ला शिवसेनेने भाजपसोबत युती करून विधानसभा निवडणूक लढवली, निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपला डावलून दोन्ही काँग्रेस सोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष असतानाही सेनेमुळे भाजप सत्तेबाहेर राहिला आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेचा विश्वासघातकी पक्ष म्हणून आरोप करत आहे. मात्र तरीही गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होऊनही भाजपला विशेष चमत्कार करता आलेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकालही संमिश्र लागले आहेत. दरम्यान राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे पुन्हा एकदा राज्य पातळीवरील राजकारणात सक्रिय झालेले दिसत आहेत. त्यामुळे अटकळांना उधाण आले आहे.

(हेही वाचा ‘मी शरद पवारांचा माणूस आहे’, संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं)

शरद पवारांच्या घरी डिनर डिप्लोमसी

दोनच दिवसांपूर्वी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील घरात महाराष्ट्राचे खासदार आणि आमदार जमले होते. त्यावेळी पवारांच्या घरी रात्री जेवणाला महाविकास आघाडीचे घटक पक्षही सहभागी झाले होते, मात्र त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दिल्लीत पवारांच्या घरात डिनर डिप्लोमसी सुरू होण्याच्या काही तास आधी ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली होती. शरद पवार यांच्या शेजारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शिवसेना खासदार संजय राऊत बसले होते. सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, डॉ. फौजिया खान, विनायक राऊत, निवास पाटील, डॉ.अमोल कोल्हे, श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकर यांच्यासह आघाडीचे बहुतांश नेते सहभागी झाले होते.

गडकरी आणि ठाकरे यांची भेट

दिल्लीतील डिनर डिप्लोमसीच्या काही दिवस आधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ येथे दोन्ही नेत्यांची भेट झाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.