उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटावर एकेकेळी सातत्याने टीका करणा-या दीपाली सय्यद या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. पण यामुळे शिंदे-भाजप मध्ये मात्र मिठाचा खडा पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपमधील अनेक नेत्यांनी दीपाली सय्यद यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सय्यद यांचा शिंदे गटातील प्रवेश लांबणीवर जात असल्याचे बोलले जात आहे.
भाजपचा सय्यद यांना विरोध
महाविकास आघाडी सत्तेत असताना दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यामुळे सय्यद यांनी आधी भाजप व पंतप्रधान मोदी यांची माफी मागावी आणि मगच त्यांना शिंदे गटात प्रवेश दिला जावा, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या नेत्या मृणाल पेंडसे यांनी केली आहे.
(हेही वाचाः आव्हाडांना अटक करणा-या उपायुक्तांची बदली, दिले हे महत्वाचे पद)
त्यांना पक्षप्रवेश देऊच नका
कुठलीही पात्रता नसलेल्या, कोणतीही विचारधारा नसणा-या आणि आपली मते सातत्याने बदलणा-या दीपाली सय्यद या शिंदे गटात प्रवेश करत आहेत. या पक्षप्रवेशाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणा-या व्यक्तींना शिंदे गटात प्रवेश देताच कामा नये, अशी भूमिका मृणाल पेंडसे यांनी मांडली आहे.
Join Our WhatsApp Community