फडणवीस झाले ‘पत्रवीर’… मुख्यमंत्र्यांना लिहिली इतकी पत्रे

कायमंच आपल्या आक्रमक शैलीत विरोधकांवर निशाणा साधणा-या फडणवीसांच्या नावे एक नवा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.

132

काही दिवसांपूर्वीच विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजही मी मुख्यमंत्री नाही, हे मला कधीच जाणवत नसल्याचे म्हटले होते. त्यावरुन त्यांच्यावर महाविकाल आघाडजी सरकारमधील अनेक नेत्यांनी टीकेची झोड उठवली. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा फडणवीसांच्या या विधानाचा शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात समाचार घेतला होता.

पण फडणवीसांच्या या वक्तव्यात तथ्य असल्याचे आता समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते म्हणून गेल्या पावणे दोन वर्षांत राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तब्बल 231 पत्र लिहिल्याची माहिती एका माहितीच्या अधिकारात समोर आली आहे. त्यामुळे कायमंच आपल्या आक्रमक शैलीत विरोधकांवर निशाणा साधणा-या फडणवीसांच्या नावे एक नवा रेकॉर्ड नोंदवला गेला असल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचाः मी मुख्यमंत्री नसल्याचे वाटतच नाही! असे का म्हणाले फडणवीस?)

दरमहा सरासरी 10 पत्रे

आरटीआय कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी मागवलेल्या माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस कायमंच राज्यातील प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचे ट्वीट करत सांगत असतात. त्यांनी गेल्या दीड वर्षांच्या काळात केलेल्या या ट्वीटची सत्यता पडताळण्यासाठी प्रफुल्ल सारडा यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज केला होता. त्यावेळी फडणवीसांनी तब्बल 231 पत्रे मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री कार्यालयाला दिल्याचे समोर आले आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दरमहा सरासरी 10 पत्रे लिहिले असल्याचे सारडा यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?

मागील 2 वर्षे मी एकही दिवस घरात न थांबता जनतेच्या सेवेत आहे. त्यामुळे मला कधीही जनतेने हे जाणवू दिले नाही की मी मुख्यमंत्री नाही, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

(हेही वाचाः मी मुख्यमंत्री आहे, असे मला कधीच वाटणार नाही! मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.