विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा कार्यकर्त्यांचे ‘देवा भाऊ…’ प्रचार गीत; Devendra fadanvis यांचे ब्रॅण्डिंग

41
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा कार्यकर्त्यांचे 'देवा भाऊ...' प्रचार गीत; Devendra fadanvis यांचे ब्रॅण्डिंग
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा कार्यकर्त्यांचे 'देवा भाऊ...' प्रचार गीत; Devendra fadanvis यांचे ब्रॅण्डिंग

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे, त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी थेट त्यांचा नेता देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांचा ब्रॅण्डिंग करणारे ‘ देवा भाऊ…’ हे प्रचार गीत तयार केले आहे. या माध्यमांतून कार्यकर्त्यांनी आधीच प्रचाराचा नारळ फोडला आहे.

देवा भाऊ गाण्यात नेमकं काय?

एकीकडे राज्यात लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय झाली आहे. ही योजना जरी महायुतीच्या सरकारने आणलेली असली तरी, याचे श्रेय तिन्ही पक्षातील कार्यकर्ते आपापल्या पक्षालाच देत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजप कार्येकर्त्यांनी माझी लाडकी बहीण योजनेचे श्रेय दाखवण्यासाठी भाजपाकडून जाहिरातीच्या मार्फत प्रचार केला जात आहे. त्यासाठी बहिणींचा भाऊ ‘देवा भाऊ’ या गाण्यांमार्फत जाहिरात केली जात आहे.

फडणवीसांच्या व्यक्तिमत्वाचा गाण्यावर प्रभाव

विकासकामांचा सपाटा, प्रभावी निर्णयक्षमता आणि मोठमोठे प्रकल्प समयपूर्व पूर्ण करण्याची हातोटी या देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या व्यक्तिमत्त्वाचा या गाण्यावर प्रभाव पडलेला दिसत आहे. गाण्याच्या सुरूवातीला फडणवीसांचं लक्ष्य नेमकं काय हे सांगताना या गाण्यात दिवसरात्र, एकच लक्ष्य, एकच ध्यास, देश हाच धर्मप्राण आणि श्वास ज्याचा असे प्रेरणादायी बोल या गाण्यात आहेत. याशिवाय फडणवीसांनी 2014 ते 2019 त्यानंतर 2022 मध्ये सत्तेत आल्यानंतर काय-काय काम केली यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यात प्रामुख्याने मुंबईतील कोस्टल रोड, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मुंबईतील विस्तारलेल्या मेट्रोसह फडणवीसांनी राज्याच्या जनतेसाठी काय काय योजना राबविल्या आहेत यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.