BJP चे ५ जानेवारीला ‘घर चलो’; प्रत्येक बूथवर २०० सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट

62
BJP चे ५ जानेवारीला ‘घर चलो’; प्रत्येक बूथवर २०० सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट

आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केलेल्या भारतीय जनता पक्षाने (BJP) शहरातील प्रत्येक बूथवर २०० सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. तसेच येत्या पाच जानेवारी रोजी ‘घर चलो’ अभियानही राबविले जाणार आहे.

(हेही वाचा – Infant Mortality Rate : राज्यात घटले बालमृत्यू; शासकीय आरोग्य केंद्रातील प्रसुतींचे प्रमाण वाढले)

विधानसभा निवडणुकीत महायुतीला आणि पक्ष म्हणून भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतरही या यशामध्ये फार रममाण न राहता भाजपाने (BJP) आता महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत भाजपाने सदस्यनोंदणी मोहीम राबविण्याचे निश्चित केले आहे.

(हेही वाचा – Shiva temple मधील मूर्तींची धर्मांधांकडून तोडफोड)

या पार्श्वभूमीवर भाजपा (BJP) पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा मंगळवारी झाली. त्या वेळी प्रत्येक बूथवर २०० सदस्य नोंदणी करण्याचे निश्चित करण्यात आले. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, शहराध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस पुनीत जोशी, रवींद्र साळेगांवकर, राघवेंद्र मानकर, प्रमोद कोंढरे, महेश पुंडे, राजेंद्र शिळीमकर या वेळी उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.