वक्फ कायदा सुधारणेला शिवसेना उबाठाचा विरोध, हिंदुत्वाच्या भूमिकेवर BJP चा हल्लाबोल

106
वक्फ कायदा सुधारणेला शिवसेना उबाठाचा विरोध, हिंदुत्वाच्या भूमिकेवर BJP चा हल्लाबोल
  • प्रतिनिधी

वक्फ कायदा सुधारणेला विरोध करताना शिवसेना उबाठाने हिंदूंच्या हितांना धोका पोहोचवल्याचा आरोप भाजपा (BJP) नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी केला आहे. या प्रकरणावर ट्विट करत शेलार यांनी शिवसेना उबाठाचा चेहरा उघडा पाडल्याचे म्हटले आहे.

शेलार यांनी ट्विटमध्ये सांगितले की, वक्फ कायदा सुधारणा विधेयकावर शिवसेना उबाठाचे खासदार अरविंद सावंत आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी एकत्रित मतदान केले. या कृतीला शेलार यांनी “हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार” असे संबोधले. त्यांनी शिवसेना उबाठावर औरंगजेब फॅन क्लब वाढवण्याचा आरोपही केला. (BJP)

(हेही वाचा – Delhi Assembly Election : फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार दिल्लीतील राजकीय समीकरणांमध्ये बदलाची शक्यता)

शेलार यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना उबाठाला सुनावत, त्यांच्या भूमिकेवर कठोर टीका केली. भाजपाने (BJP) या घटनेला देशाच्या राजकीय इतिहासातील काळ्या शाईने लिहिण्यासारखी घटना असल्याचे म्हटले आहे.

वक्फ कायदा सुधारणा विधेयकावर झालेल्या या मतदानानंतर भाजपाने (BJP) शिवसेना उबाठाला हिंदुत्वाशी फसवणूक करणारा गट असल्याचा ठपका लावला आहे. शेलार यांच्या या विधानावर शिवसेना उबाठाची काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.