राऊतांची तत्काळ शिवसेनेतून हकालपट्टी करा, भाजपची उद्धव ठाकरेंकडे मागणी

136

मुंबईमध्ये महाविकास आघाडीकडून शनिवारी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह शिंदे गट आणि भाजपाच्या काही नेत्यांनी महापुरूषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आल्याचे महाविकास आघाडीकडून सांगण्यात आले होते. या महामोर्च्यानंतर सत्ताधारी शिंदे-भाजप यांच्याकडून टीका करण्यात आली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्च्याचा उल्लेख नॅनो मोर्चा असा केला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत त्यांचे सर्व पदाधिकारी आणि फडणवीस यांनी केलेले विधान म्हणजे त्यांची बुद्धीमत्ता नॅनो असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. यावेळी राऊतांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत महामोर्चातील गर्दी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता, हा व्हिडिओ मराठा क्रांती मोर्चातला असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात आला आहे. भाजपा नेते प्रसाद लाड यांनी या व्हिडिओवरून संजय राऊतांवर टीका केली आहे.

काय म्हणाले प्रसाद लाड

गेल्या काही काळापासून संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे सातत्याने मराठा समाज, मराठा मोर्चा, मराठा आंदोलन आणि मराठा आरक्षणाचा अपमान केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांची शिवसेनेतून हकालपट्टी करावी, अशी मागणीही प्रसाद लाड यांनी केली आहे. सोशल मिडियावर व्हिडीओ शेअर करत लाड यांनी ही मागणी केली आहे.

(हेही वाचा – एलॉन मस्क ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा देणार! ट्विट केले आणि…)

महाविकास आघाडीचा नॅनो मोर्चा किती मोठा होता हे दाखवून देत असताना मराठा क्रांती मोर्च्याचा मुंबईतील मोर्चा ज्याच्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळाला, तो मोर्चा जणू आमचाच आहे. अशा प्रकारचा व्हिडिओ ट्विट करण्याचे काम संजय राऊत यांनी केले आहे, असे म्हणत प्रसाद लाड यांनी राऊतांकडे एक मागणी केली आहे, मराठा समाजाची व मराठा क्रांती मोर्चाची माफी मागितली पाहिजे आणि संपूर्ण समाजाला तुम्ही धारेवर धरण्याचा प्रयत्न करत आहात. त्यामुळे भाजपने उद्धव ठाकरेंकडे संजय राऊत यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.