मुंबई पोलिसांकडून दरेकरांची साडेतीन तास चौकशी

महाविकास आघाडी सरकारकडून दडपशाही सुरु

92

महाविकास आघाडी सरकारची दडपशाही सुरू आहे. त्यातूनच भाजपच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. अशाच प्रकारे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या एका प्रकरणात माता रमाबाई आंबडेकर मार्ग पोलीस ठाण्यात पोलिसांनी आपली सुमारे साडेतीन तास चौकशी केली. पोलिसांनी आपल्याला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते, त्यानुसार आपण पोलीस ठाण्यात उपस्थित राहून पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.

पोलिसांकडून तब्बल साडेतीन तास चौकशी

पोलिसांच्या सूचनेनुसार, आज प्रविण दरेकर सकाळी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाले. दरेकर यांची सुमारे साडेतीन तास पोलिसांनी चौकशी केली. चौकशी संपल्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी दरेकर बोलत होते. त्यांनी सांगितले की, पोलीस तेच-तेच प्रश्न उलटसुलट पध्दतीने विचारत होते. पोलिसांनी यावेळी नियमबाह्य प्रश्न विचारण्याचाही प्रयत्न केला. चौकशीदरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी विविध प्रकारे आपल्याकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तपासात जेवढे गरजेचे होते तेवढी सर्व माहिती आपण पोलीस अधिका-यांना दिली. मुंबईचे पोलीस आयुक्त माझ्या चौकशीची स्थिती मॉनिटर करत होते. पोलिसांवर राज्य सरकारचा दबाव असल्याचे स्पष्टपणे दिसत होते असेही दरेकर यांनी सांगितले.

(हेही वाचा -औरंगाबादनंतर पुण्यातही आल्या ऑनलाईन ९२ तलवारी!)

“आवश्यकता वाटल्यास पोलीस ठाण्यात पुन्हा जाऊ”

माझी चौकशी सुरू असताना, चार पाच वेळेला पोलीस निरीक्षक आतमध्ये अँण्टी चेंबर्समध्ये ये-जा करित होते व फोनवर बोलत होते. पण त्यांना नेमके कोणाचे फोन होते हे समजू शकले नाही. माझा फोन चार्जिंगसाठी बंद करून ठेवला होता परंतु माझा समज झाला होता की माझा फोन काढून बंद केला असेही त्यांनी सांगितले. पोलिसांना या प्रकरणात माझी पुन्हा चौकशी करण्याकरिता पुन्हा आवश्यकता वाटल्यास बोलाविल्यास आपण पोलीस ठाण्यात पुन्हा जाऊ. पोलिसांना जे-जे सहकार्य हवे असेल ते सर्व सहकार्य पोलिसांना देण्यात येईल, असेही प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.