राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल दोन दिवसानंतर लागणार आहेत, सध्याची निवडणूक पाहिल्यावर मविआ आणि महायुती या दोघांना समसमान जागा मिळतील अशी शक्यता आहे, त्यामुळे दोघांना सत्ता स्थापनेची संधी मिळू शकते, मात्र त्यातल्या त्यात राज्यात भाजपाने (BJP) सार्वधिक जागा लढवल्याने भाजपाकडे सर्वात जास्त आमदार असू शकतील, त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी प्रथम भाजपालाच निमंत्रण दिले जाईल. म्हणून भाजपाने आतापासूनच बंडखोरांना संपर्क करण्याचे मिशन हाती घेतले आहे.
(हेही वाचा राहुल गांधी हे भारत आणि पंतप्रधानांची बदनामी करतात; Adani प्रकरणी आरोपांवर भाजपाने सुनावले)
विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपली असून शनिवारी मतमोजणी होणार आहे. यावेळी राज्यात कोणाचे सरकार येणार? याविषयी अंदाज लावले जात आहेत. मात्र अनेक मीडिया संस्थांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्षच राहील, हे जवळपास स्पष्ट मानले जात आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा करताना अपक्षांची मदत लागू शकते. याची तयारी भारतीय जनता पक्षाने (BJP) आतापासूनच सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाचे अनेक बंडखोर या निवडणुकीत उभे होते. यातील विजयाची शक्यता असणाऱ्या बंडखोरांशी आतापासूनच संपर्क ठेवण्याची जबाबदारी भाजपाच्या राज्यातील नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.
बंडोबांवरील कारवाई मागे घेणार
जागावाटपाच्या वेळी महायुतीतील काही इच्छूकांनी तिकीट न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवली, त्यातील काही अपक्ष निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता त्या अपक्षांवरील कारवाई मागे घेण्याच्या तयारीत भाजपा आहे.
Join Our WhatsApp Community