“उरलेल्या दोनचार जणांना टिकवा, नाही तर…”, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिलदार नेते असून ते माझे मित्र आहेत. त्यामुळे मला ते भेटले. उद्धव ठाकरेही आमचे मित्र आहेत, परंतु ते शरद पवारांच्या नादी लागले. उद्धव ठाकरेंबद्दल एक सांगतो एक दिवस असा येईल की, ते चारच लोकं राहतील. माझे कुटुंब, माझी जबाबदारी अशी त्यांची अवस्था होईल. उद्धवजी तुमचे उरलेले दोन चारजण काय आहे ते वाचवा, नाहीतर शिंदे साहेब तेही घेऊन जातील, त्यामुळे केवळ टीका करणं सोडा, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनखुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

(हेही वाचा – रूपी बँकेनंतर आणखी एका बँकेवर RBI ची कारवाई! तुमचं ‘या’ बँकेत खातं तर नाही ना?)

ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सहकारमंत्री अतुल सावे, भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सचिव प्रवीण घुगे आणि औरंगाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय अवताडे उपस्थित होते.

काय म्हणाले बावनकुळे

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतका धसका का घेतला आहे, समजत नाही. त्यांच्याविषयी उद्धव ठाकरे यांनी विचार करून बोलावे नाही तर उरलेल्या आमदारांपैकी बहुतेकजण सोडून जातील आणि ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ म्हणत केवळ चारच उरतील, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. यावेळी शिवसेनेच्या जन आक्रोश मोर्चावरही चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी टीका केली. शिवसेनेला जन आक्रोश मोर्चा काढण्याचा अधिकार नाही. ते इव्हेंड मॅनजमेंट करत आहेत, अशी टीका बावनकुळे यांनी केली. तर पुढे बोलताना बावनकुळे असेही म्हणाले की उद्धव ठाकरे घाबरले आहेत. म्हणून ते मोठाली भाषणं करत आहे. त्यांनी विचार करून बोललं पाहिजे. अमित शहा आणि उद्धव ठाकरे म्हणजे सूर्यासमोर दिवा आहे. त्यांचं नाव घेऊन बोलू नये, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

याच बरोबर भाजपामुळे विधानसभा निवडणूक जिंकल्यावर उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी विश्वासघात केलात. विश्वासघातामुळे तुम्हाला जनतेने वारंवार धडा शिकवलाय. ग्रामपंचायतीत काय झाले पहा. उरलेला करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत करू. तयार रहा. अमित शहांवर टीका करण्यापूर्वी उद्धवजी स्वतःला सांभाळा. विश्वासघात करून तुमच्या कुळाला बट्टा लावला आहे. ते आधी पहा, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here