कॉंग्रेस आणि एमआयएमचा खासदार असलेल्या चंद्रपूर आणि औरंगाबादमध्ये झंझावाती सभा घेऊन लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणारे भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा महाराष्ट्रात पुन्हा येणार आहेत. २० जानेवारीला ते पुण्यात येत असून, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात त्यांची तोफ धडाडणार आहे.
( हेही वाचा : …तर महापालिकेतील पक्ष कार्यालयांना वाळवी?)
गेल्या निवडणुकीत गमावलेल्या १४४ लोकसभा मतदारसंघावर भाजपाने विशेष लक्ष केंद्रीत केले असून, महाराष्ट्रातील १८ जागांचा त्यात समावेश आहे. त्याअनुषंगाने अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी चंद्रपुरातून प्रचाराचा नारळ फोडला. शिवाय औरंगाबादमध्येही सभा घेत महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर नड्डा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा दुसरा टप्पा जाहीर झाला असून, येत्या २० जानेवारीला ते पुण्यात येणार आहेत. पुण्यातील शिरूर मतदार संघ आणि भोसरीत त्यांची जाहीर सभा होणार आहे.
अढळरावांचे तिकिट कापणार?
शिरूर लोकसभा मतदार संघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे खासदार आहेत. त्या आधीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसनेकडून शिवाजीराव अढळराव पाटील खासदार होते. या मतदारसंघात भाजपचा आजी आणि माजी खासदार नसतानाही, शिरूर मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले जात असल्याने शिंदे गटात दाखल झालेल्या अढळराव पाटलांचे तिकिट कापले जाणार का, अशा चर्चा यानिमित्ताने सुरू झाल्या आहेत.
Join Our WhatsApp Community