कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता सापडलेल्या काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी (BJP) प्रदेश महिला मोर्चाने सोमवारी, ११ डिसेंबर रोजी राज्यभरात आक्रमक होत आंदोलन केले. मुंबईत चर्चगेट येथे महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. ”मोहब्बत की दुकान” चा सेल्समन असलेल्या साहू यांच्याकडे इतका अमाप काळा पैसा असेल तर दुकानाच्या मालकाकडे किती काळा पैसा असेल असा सवाल चित्रा वाघ यांनी यावेळी बोलताना केला.
७० वर्षे गरीबांचा पैसा लुटणा-या कॉंग्रेसच्या अन्य नेत्यांवर देखील छापे टाकत त्यांची अवैध संपत्ती जप्त करून पै न पै चा हिशोब मोदी सरकार कडून केला जाईल असा विश्वास भाजपच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. कॉंग्रेसच्या राहुल गांधीच्या मोहोब्बत की दुकान मधले खासदार साहू यांच्याकडे अमाप रोकड सापडल्यानंतर जनतेचे पैसे लुटणा-या कॉंग्रेसचा भ्रष्ट चेहरा समोर आला. गरीबी हटाओ चा नारा देणा-या कॉंग्रेसने लाज बाळगायला हवी असा घणाघातही वाघ यांनी केला.
(हेही वाचा Karnataka Politics : कर्नाटकात पुन्हा राजकीय नाट्य होणार ? कुमारस्वामी यांचा मोठा दावा)
खासदार साहू विरोधात काही ठिकाणी जोडे मारो आंदोलन तर काही ठिकाणी साहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. मोहब्बत की दुकान, चोरी का सामान…मोदी जी बोले तो देश की गॅरंटी और कॉंग्रेस बोले तो चोरी की गॅरंटी.. जनता करणार नाही माफ, भ्रष्ट कॉंग्रेसींना करा साफ अशा आशयाचे फलक घेऊन साहू आणि कॉंग्रेस विरोधात ठिकठिकाणी घोषणाबाजी देखील करण्यात आली. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याचा विडा उचलणाऱ्या मोदी सरकारच्या कारकिर्दीत भ्रष्ट कॉंग्रेसच्या नेत्य़ांकडून जनतेचा लुटलेला एक-एक पैसा परत दिला जाईल ही ‘मोदी की गॅरंटी’ आहे असा विश्वास आंदोलनांवेळी व्यक्त करण्यात आला.
Join Our WhatsApp Community