अमेरिकेत जाऊन आरक्षणविरोधी वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात भाजपाच्या वतीने शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते ठिकठिकाणी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड झाला असून सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसची दुटप्पी भूमिका भाजपा कदापि खपवून घेणार नाही. ‘काँग्रेस हटाओ आरक्षण बचाओ’ असा नारा पक्षातर्फे ठिकठिकाणी होणाऱ्या आंदोलनातून देण्यात येणार आहे.
(हेही वाचा – Health Sector : आरोग्यसेवेला हिंसाचाराची लागण एक गंभीर समस्या)
बावनकुळे हे अकोला येथे, आशीष शेलार, पंकजा मुंडे मुंबईत आयोजित आंदोलनात सहभागी होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण ठाण्यात, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन जळगावात आंदोलन करणार आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पुण्यात, चंद्रपूरमध्ये सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, छत्रपती संभाजीनगर येथे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, नंदुरबार येथे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे. अहिल्यादेवी नगर येथे आमदार राम शिंदे, नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे तर नागपूरमध्ये प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आंदोलनात सहभागी होणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community