पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराचा भाजपकडून निषेध!

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ राज्यभर भाजपच्या वतीने ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपाने निदर्शने केली.  

92

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तांध तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेला हिंसाचार ही लोकशाहीची हत्या आहे. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते आज राज्यभर ठिकठिकाणी निदर्शने करीत आहेत. त्याचा भाग म्हणून पुणे शहर भाजपच्या वतीने ५ एप्रिल रोजी महात्मा गांधी पुतळा पुणे स्टेशन येथे आंदोलन करण्यात आले.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे, असे प्रकार घडत आहेत. पुणे शहर भाजपच्या वतीने आम्ही याचा जाहीर निषेध करीत आहोत. प्रसंगी खासदार गिरीश बापट, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनिल कांबळे, आमदार बापूसाहेब पठारे, धिरज घाटे, सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित होते.

(हेही वाचा : राज्यात कशी लागू होते ‘राष्ट्रपती राजवट’? जाणून घ्या संविधानातील तरतूद)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानाबाहेरही भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये स्वतः आमदार पाटील सहभागी झाले होते. देशातील चार राज्यांबरोबर पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात आसाममध्ये भारतीय जनता पार्टी, केरळमध्ये डावे, तामिळनाडूमध्ये डीएमके आणि पुदुचेरीमध्ये भाजपा यांनी यश मिळवले. येथे निवडणुका नंतर सर्व वातावरण शांत आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. येथे तृणमूल काँग्रेसने २०० जागा मिळवल्या. त्यात २ कोटी ७६ लाख मते पडली, तर भारतीय जनता पार्टीला ७८ जागांवर विजयमिळाला आहेकेवळ ४० लाख मतांचा फरक पडला. तिथे भारतीय जनता पार्टीचे विचार रुजवणारे हजारो कार्यकर्ते या निवडणुकीत राबत होते. त्या कार्यकर्त्यांनी यापुढे भाजपाचे विचार येथे रुजवू नयेत, याकरिता त्यांना घाबरवण्यासाठी हा हिंसाचार सुरू आहे, असा आरोप  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.