जब तक मलिक का इस्तिफा नही आता है, हम न रुकनेवाले, न झुकनेवाले है!

107

हे सरकार संजय राठोड, अनिल देशमुख यांचा राजीनामा घेते, मग दाऊदच्या माणसाचा राजीनामा का घेत नाही, आम्ही राजीनामा होत नाही तोवर संघर्ष सुरूच ठेवणार आहे. आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आम्ही पंतप्रधान मोदींचे सैनिक आहोत, तुम्ही मोदींना संपवण्यासाठी एकत्र आला, मात्र जमले नाही, ते वैश्विक नेते बनले आहेत. आम्हाला त्यांचा आशीर्वाद आहे. विधानसभेतील कालचा बाँम्ब पहिला आहे, असे अनेक बॉम्ब आहेत, वेळच्या वेळी ते फुटतील. राजीनामा घेतला नाही तर आपल्याला मौका अजून मिळणार आहे, जब तक नवाब मलिक का इस्तिफा नही आता है, हम न रुकनेवाले है, ना झुकनेवाले है!, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला.

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपाचा बुधवारी, ९ मार्च रोजी आझाद मैदानात नवाब मलिक हटाओ, महाराष्ट्र बचाओ मोर्चा काढला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा इत्यादी उपस्थित होते.

(हेही वाचा ‘तुरूंगातील मंत्री…पाताळयंत्री’ मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा धडक मोर्चा!)

टेरर फंडींगमध्ये मलिकांचा सहभाग

हा संघर्ष देशभक्तांचा आहे, जोवर बॉम्बस्फोट करणा-यांशी व्यवहार करणाऱ्यांचा राजीनामा होत नाही, तोवर आम्ही शांत बसणार नाही, रोज घटना घडत आहेत, आम्ही रोज राजीनामा मागत नाही, पण ही घटना राज्यासाठी लाजीरवाणी आहे. बॉम्बस्फोटाचा आरोपी सरदार शहावली खान आणि दुसरा सलीम पटेल जो दाऊदची बहीण हसीना प्रकारचा फ्रंट मॅन आहे, या दोघांनी मिळवून हे षडयंत्र रचले. मुंबईच्या हत्यारासोबत व्यवहार करताना तुम्हाला का दिसले नाही? पैशासाठी आंधळे झालात. ज्यावेळी ईडीने याची चौकशी केली, तेव्हा समजले या व्यवहारामागे हसीना पारकर होती. तिला पैसे देण्याचे व्यवहार समोर आले, त्यानंतर मुंबईत ३ बॉम्बस्फोट झाले आहेत, त्यासाठी हा पैसा वापरला गेला, टेरर फंडींगसाठी महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा सहभाग होता, शरद पवार म्हणतात राजीनामा घेणार नाही, उद्धव ठाकरेही तेच म्हणतात, त्यांना एक दिवस बाळासाहेबांना उत्तर द्यायचे आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.