“…ज्यांनी पोलिसांना सुद्धा सोडलं नाही, चोराच्या उलट्या बोंबा”; विरोधी पक्षांच्या नेत्यांची नार्को टेस्ट करा भाजपची मागणी

111

वेदांता-फॉक्सकॉनपाठोपाठ आता संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरात गेला आहे. हा प्रकल्प नागपूरातील मिहानमध्ये साकारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता. उदय सामंत यांनी सप्टेंबरमध्ये याची घोषणाही केली होती. मात्र आता २२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरात राज्यातील बडोदा येथे उभारला जाईल. यावरून राज्यतील राजकारण चांगलंच तापलं आहे. यावर आता भाजप नेते राम कदम यांनी एअरबस आणि वेदांता फॉक्सकॉनवर खोटं बोलणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांची नार्कोटेस्ट करावी अशी मागणी केली आहे.

( हेही वाचा : T20 World Cup : सामन्यापूर्वी भारतीय फलंदाजांना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाने केले चॅलेंज, म्हणाला…)

प्रकल्पांना इतर राज्यात का जावे लागले? 

नार्को टेस्ट केल्यावर सर्व गुपिते आणि वसुलीच्या कहाण्या बाहेर येतील असा दावाही राम कदम यांनी केला आहे. एअरबस आणि वेदांता फॉक्सकॉनवर खोटं बोलणाऱ्या सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांची नार्को टेस्ट करा. वेदांचा फॉक्सकॉनच्या टीमने तळेगावला जागा फायनल करून सुद्धा त्यांना इतर राज्यात का जावे लागले असा सवाल राम कदम यांनी ट्वीट करत केला आहे.

सत्तेच्या काळात ज्यांनी छोट्या मोठ्या हॉटेलवाल्यांपासून कॉन्ट्रॅक्टरपर्यंत, आणि बदल्यामध्ये किती करोड रुपये घायचे याची लिस्टच बनवली होती. ज्यांनी वाझेपासून अधिकाऱ्यांना वसुली वसुली खेळात जुपले होते. पोलिसांना सुद्धा ज्यांनी सोडलं नाही. ते करोडो करोडोच्या प्रोजेक्टला सहज काही वसुली न करता सोडतील का ? असा सवालही राम कदम यांनी #चोराच्या उलट्या बोंबा वापरत केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.