सेनेत आग लावण्याचं माझं काम नाही, दानवेंची शिवसेनेवर कुरघोडी

142

नववर्षाच्या सुरूवातीलाच भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी राज्यातील मंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी रावसाहेब दानवेंनी शिवसेनेवर कुरघोडी केली आहे. औरंगाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘शिवसेनेत आग लावण्याचे काम माझे नाही, मी आग लावलेली नाही. एकनाथ शिंदे हे अनुभवी नेते आहेत, मनातली ईच्छा ते बोलले नाहीत. एकनाथ शिंदे हे सक्षमपणे राज्याचा कारभार चालवू शकतात याचा मला विश्वास आहे.’

एकनाथ शिंदे पद सांभाळण्यासाठी सक्षम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत ठीक होण्यास वेळ लागत असेल तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नेतृत्व का सोपवत नाहीत, असा सवाल दानवे यांनी उपस्थितीत केला आहे. दानवेंच्या या विधानावर राजकीय क्षेत्रात एकच चर्चेचं वातावरण निर्माण झालं असून त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. यापुढे दानवे असेही म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही काळ आजारातून बरे झाले नाही तर एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सोपावला पाहिजे. कारण ते पद सांभाळण्यासाठी सक्षम आहेत. मी सेनेत आग लावण्याचे काम करत नसून मुख्यमंत्र्यांनतर शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे हेच नेते एक आहेत.

(हेही वाचा – अनिल परबांचे दापोलीतील अनधिकृत रिसॉर्ट तोडण्यासाठी कारणे दाखवा नोटीस!)

विनाप्रमुखांचं राज्य कसे चालेल?, दानवेंचा सवाल

एकनाथ शिंदे यांच्याकडे मी एक सक्षम नेतृत्व म्हणून पाहतो. मुख्यमंत्री काही काळ आजारातून बरे झाले नाहीत, तर एकनाथ शिंदे यांच्याकडेच मुख्यमंत्री पदाचा कार्यभार दिला पाहिजे असेही दानवे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. ते बरे व्हायला काही दिवस तरी लागतील. अशावेळी विनाप्रमुखांचं राज्य कसे चालेल? असा प्रश्न रावसाहेब दानवे यांनी विचारला. मुख्यमंत्री आजारातून लवकर बरे व्हावेत, अशी माझी आणि आमच्या पक्षाची भूमिका आहे. त्यांनी या राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा उपलब्ध व्हावं, असं आमचं मत आहे. पण मुख्यमंत्री आजारी असताना हे राज्य कसं चालेल? एकनाथ शिंदेंसारखा सक्षम माणूस हे राज्य चालवू शकतो, पण तरीही त्यांच्याकडे जबाबदारी दिली जात नाही. एकनाथ शिंदे यांनाच नव्हे कुणालाही द्या, राष्ट्रवादीला द्या, अजित पवारांना द्या. संधी दिली पाहिजे, अशीही सूचनाही दानवे यांनी औऱंगाबादेत बोलताना पत्रकारांना सांगितले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.