भाजपाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर निर्णय झाला. त्यामध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याआधी धनकड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तसेच धनकड यांनी शुक्रवारी, १५ जुलै रोजी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. विद्यमान उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 11 ऑगस्ट रोजी संपत आहे.
6 ऑगस्ट रोजी होणार मतदान
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. 20 जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना 22 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. देशाचा पुढील उपराष्ट्रपती निवडण्यासाठी 6 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडीसाठी 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणीही होणार असून निवडणुकीचे निकालही लागणार आहेत.
(हेही वाचा सत्तांतरानंतर अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याचा अल्बम ‘तेरे बिन अब तो सनम…’)
Join Our WhatsApp Community