भाजपाने (BJP) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. महायुतीमध्ये जागा वाटपात घटक पक्ष एकमेकांच्या जागांवर दवे करू लागले होते, त्यामुळे विद्यमान आमदारांची गोची झाली होती, त्यांना संधी मिळेल का, अशी भीती वाटत होती. अशीच भीती ऐरोलीतील विद्यमान आमदार गणेश नाईक यांना वाटत होती. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांना भेटायला जाणार होते. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते. मात्र जर असे झाल्यास ऐरोलीसह बेलापूरयेथील मतदारसंघावरही परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे नवी मुंबईतील फूट आणि राजकीय नुकसान भाजपाने टाळले.
अखेर भाजपाने (BJP) गणेश नाईक यांना ऐरोली मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. तर, बेलापूर मतदार संघातून मंदा म्हात्रे यांना उमेदवाकरी देण्यात आली आहे. बेलापूर (Belapur), ऐरोली (Airoli) या दोन्ही मतदारसंघावर गणेश नाईक यांनी दावा केला आहे. जर या दोन्ही ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही तर ते पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान भाजपने जाहीर केलेल्या यादीत ऐरोली मतदार संघातून गणेश नाईक यांना तर बेलापूर मतदार संघातून मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (BJP)
काय आहे गणेश नाईक यांची राजकीय कारकीर्द?
1994-95 मध्ये गणेश नाईक आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये पर्यावरण मंत्री म्हणून काम पाहिले. 2004 ते 2009 आणि 2009 ते 2014 अशा सलग दोन वेळा ते आमदार म्हणून पुन्हा निवडून आले. या संपूर्ण कालावधीत, त्यांनी उत्पादन शुल्क, पर्यावरण आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा कॅबिनेट मंत्रीपद भूषवले. 2019 मध्ये, ते चौथ्यांदा नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. विक्रमी फरकाने विजयी झालेल्या पहिल्या दहा उमेदवारांमध्ये त्यांचा समावेश होता. २०२४ मध्ये मात्र त्यांना उमेदवारी मिळेलच का, याची शाश्वती नव्हती, त्यामुळे गणेश नाईक पर्याय शोधू लागले होते, हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत होते, असे झाले असते नवी मुंबईतील केवळ ऐरोली मतदार संघाचं नव्हे तर बेलापूर मतदारसंघातही परिणाम झाला असता. (BJP)
Join Our WhatsApp Community