राजस्थान आणि बिहारसाठी, भाजपाने गुरुवारी (२५ जुलै) उशिरा नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावांची घोषणा केली. पक्षाने बिहार भाजपाची जबाबदारी बिहार सरकारचे मंत्री दिलीप कुमार जैस्वाल यांच्याकडे सोपवली आहे. यापूर्वी ही जबाबदारी उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे होती. तर राजस्थानमध्ये सहप्रभारी म्हणून विजया रहाटकर यांची निवड केली आहे. (BJP)
दरम्यान, पक्षाने राजस्थानचे राज्यसभेचे खासदार मदन राठोड यांना राजस्थान प्रदेशाध्यक्ष केले आहे. यापूर्वी लोकसभा खासदार सीपी जोशी हे राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष होते. २४ जुलै रोजीच त्यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर राजीनामा दिला होता. (BJP)
(हेही वाचा – CM Eknath Shinde : नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर येथे कांदा महाबॅंक सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश)
याशिवाय भाजपाने सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रभारी बदलले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सर्व नावांची घोषणा केली, ज्याची माहिती भाजपाने X वर पोस्ट केली. (BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community