शिवसेनेतून उठाव करत अवघ्या दहा दिवसांत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि शिवसेनेचे 12 खासदारही शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हाच प्रश्न उपस्थित झाला. आपल्याला समर्थन देणा-यांना आपण पडून देणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी थेट विधानसभेत सांगितले. त्यांचे हे विधान इंडिया टिव्हीने केलेल्या एका सर्व्हेतून खरे होताना दिसत आहे.
(हेही वाचाः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले जानव्याचे महत्व सरकारी पुस्तकातून वगळले)
जर देशात आता लोकसभा निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात याचा अंदाज मूड ऑफ नेशन्स या इंडिया टिव्हीने केलेल्या सर्व्हेत मांडण्यात आला आहे. राज्यात भाजपला सर्वाधिक लोकसभा जागा मिळणार असून शिंदे गटाला शिवसेनेपेक्षाही जास्त जागा मिळतील, असा अंदाज या सर्व्हेतून व्यक्त करण्यात येत आहे.
काय सांगतो सर्व्हे?
जर आता लोकसभा निवडणुका लागल्या तर राज्यात लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी भाजपला 26, शिंदे गटाला 11, शिवसेनेला 3, राष्ट्रवादीला 6 आणि काँग्रेसला 2 जागा मिळतील असे या सर्व्हेतून समजत आहे. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना शिंदेंना गद्दार म्हणत असली तरी राज्यातील जनतेने शिंदे यांनाच मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती असल्याचे या सर्व्हेतून दिसत आहे.
Join Our WhatsApp Community