भाजपाच्या वतीने ई-श्रम कार्ड शिबिराचे आयोजन

भारताचे माजी पंतप्रधान ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी’ यांच्या जयंतीनिमित्त भाजपा वॉर्ड क्र. २०५ चे अध्यक्ष गणेश शिंदे ह्यांच्या अध्यक्षतेखाली ‘ई-श्रम कार्ड शिबीर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या ठिकाणी करण्यात आला कार्यक्रम

या कार्यक्रमात शिवडी विधानसभा युवती मोर्चा अध्यक्षा सोनिया जन्नेपल्ली, वॉर्ड क्र. २०५ महिला मोर्चाच्या अध्यक्षा जान्हवी राणे यांचे सहकार्य लाभले होते. शिवडी विधानसभा युवती मोर्चा व दक्षिण मुंबई सरकारी योजना सेल यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार, २६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०.०० ते ६.०० या वेळात रामटेकडी, शिवनेरी टेकडी, शिवडी येथे ‘ई-श्रम कार्ड शिबीर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

( हेही वाचा :आता विद्यापीठांत ‘पदवीदान’ नव्हे, तर ‘भूखंडदान’ समारंभ होतील! )

स्थानिक रहिवाशांचे सहकार्य लाभले

ह्या कार्यक्रमाला शिवडी विधानसभा अध्यक्ष दिलीप धुरी, शिवडी विधानसभा महामंत्री सचिन शेट्ये, शिवडी विधानसभा उपाध्यक्ष विश्वनाथ तोरस्कर, वॉर्ड क्र. २०६चे अध्यक्ष बाळासाहेब मुढे, शिवडी विधानसभा युवा मोर्चा अध्यक्ष गोविंद सिंग, वॉर्ड क्र. २०६चे महामंत्री दीपक आमकर, एकनाथ मोरे, तसेच वॉर्ड क्र. २०५ मधील सर्व पुरुष व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. रामटेकडी येथील स्थानिक रहिवाश्यांच्या सहकार्याने भारताचे माजी पंतप्रधान ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी’ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here