पिंपरी-चिंचवड शहरातील शाहूनगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान उद्घाटन प्रसंगी सत्ताधारी भाजप विरोधात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
उद्यानामुळे शहराच्या नावलौकिकात भर
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाहूनगर परिसरात महापालिकेने 14 कोटी खर्च करुन भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान तयार केले आहे. या उद्यानामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडणार आहे. आज संध्याकाळी या उद्यानाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास काही वेळ शिल्लक असतांना या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान ‘चोर हे चोर हे, बीजेपी चोर हे’ आदी घोषणा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या.
(हेही वाचा कळंबोलीत जीएसटी घोटाळा, रक्कम वाचून व्हालं थक्क)
Join Our WhatsApp Community