भाजपकडून सध्या चुकीचे, निराधार आणि बिनबुडाचे आरोप केले जात आहे. आपण जर धतिंग गिरी करत असाल, तर महापालिकेत शिवसेना आपल्याला धतिंग गिरीनेचे उत्तर देईल. त्यामुळे आमच्या वाटेला जावू नका. न्यायिक पध्दतीने जर आपण लढत असाल, तर त्यालाही आम्ही त्याच पध्दतीने सामोरे जावू. पण तुमची धतिंगगिरी यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हम भी कुछ कम नहीं है, असाच गर्भित इशारा भाजपला दिला आहे.
भाजपचा धिंगाणा घालणे एककलमी कार्यक्रम
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्दयावरून भाजपच्या नेत्यांकडून वारंवार पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर व स्थायी समिती अध्यक्ष तसेच महापौरांवर आरोप केले जात आहे. त्यातच शुक्रवारी भाजपच्या सदस्यांनी आपल्याला विषय क्रमांक ५१ वर बोलू दिले नाही, असे सांगत अध्यक्षांच्या दालनाबाहेर ठिय्या मारत आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलतांना यशवंत जाधव यांनी भाजपचा समाचार घेतला. भाजपचा सध्या धिंगाणा घालणे का एककलमी कार्यक्रम सुरु आहे. त्यांची धतिंगगिरी सुरु आहे. पण आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे ही भाजप २० ते २१ वर्षे आमच्यासोबत होते. मग तेव्हा का नाही दिसला भ्रष्टाचार? मग तो हिशोबही आम्ही मागायला हवा नाही? तुमचे बोलवते धनी कोण टकले, कुणी केस वाढलेले, दाढीवाले जे कुणी आहेत, त्यांना हे माहित नाही का? तुम्ही जी वाझेगिरीचे आरोप करता, पण कोविडच्या खरेदी प्रस्तावांची चौकशी आम्ही करायला लावली. प्रत्येक विषय तपासून आल्यानंतरच मंजूर केला.
(हेही वाचा स्थायी समितीत बोलू न दिल्याने भाजप आक्रमक! अध्यक्षांच्या दालनाबाहेर रात्री उशिरापर्यंत धरणे)
…तर तुम्हीही हिशेब द्या
जर तुम्ही आमच्याकडे कोविड निधीतील खर्चाची माहिती मागता, तर पंतप्रधान निधीतून खर्च केलेल्या रकमेचाही हिशोब मागितला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. आहे का धमक? ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महापालिकेवर केला जातो. पण वर्षाला १२ हजार कोटी. मग २० ते २१ वर्षे आपण आमच्यासोबत होता, मग तुम्ही देणार का याचा हिशोब असाही सवाल त्यांनी केला. जे आरोप केले जातात, त्यात काही तथ्य आहे का किंवा कुठला नगरसेवक दोषी आहे का? त्यामुळे हे आरोप योग्य नाही. ज्या प्रस्तावाबाबत त्यांचा आरोप आहे, त्यासाठीचा निधी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्हा नियोजन समितीच्यावतीने मंजूर झाला आहे. या खर्चाची हमी दिल्यानंतर आपल्या तो निधी मिळणार आहे. त्यामुळे त्यांना विकासाची कामे करण्याऐवजी ती अडवण्यात अधिक स्वारस्य असल्याचे त्यांनी सांगितले. वाघाचे कातडे अंगावर ओढून घेतले म्हणून कुणी वाघ होत नाही, तो कोल्हाच असतो, असे सांगत जाधव यांनी भाजपला कोल्ह्याची उपमा दिली.
Join Our WhatsApp Community