राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. त्यातून परवा जालना येथे आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याने वातावरण अधिकच तापले. या आंदोलनस्थळी आंदोलकांची भेट घेतल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (Maratha Reservation) प्रमुख शरद पवार यांनी मुंबईवरून फोन आल्यानंतर लाठीमार करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला होता. त्याला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. तसेच शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राचा बारकाईने अभ्यास केला तर त्यांची दुटप्पी भूमिका लक्षात येईल, असा दावा भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
याबाबत केलेल्या फेसबूक पोस्टमध्ये केशव उपाध्ये यांनी लिहिले की, शरद पवार यांच्या वाजत गाजत आलेल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राचा बारकाईने अभ्यास केला तर त्यांची दुटप्पी भूमिका लक्षात येईल. मराठा तरुणांमध्ये असंतोष वाढत गेल्याचे मुद्दे त्यांनी पुस्तकात मांडले आहेत. या काळात ते सत्तेवरही होते. त्यावेळी मराठा समाजाला शांत करण्यासाठी त्यांनी काय केले? आरक्षणाला थेट कायदेशीर अडचणी होत्या, तर मराठा तरुणांच्या सक्षमीकरणासाठी पवारांनी काय प्रयत्न केले? असा सवाल उपाध्ये यांनी विचारला. या पोस्टमध्ये ते पुढे लिहितात की, देवेंद्र फडणवीस यांनी सारथी सुरू केली. ज्यातून १०० पेक्षा जास्त मराठा तरुण झाले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सुरू केले, ज्यामुळे मराठा तरुण छोटे-मोठे व्यवसाय करू लागले. त्याबरोबरच देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून आरक्षण सर्वोच्च न्यायालयातील टिकवले. पण शरद पवार शिल्पकार असलेल्या सरकारच्या दुर्लक्षामुळे ते आरक्षण गेले. यावर शरद पवारांनी कधी कळवळा आला? अशी विचारणाही त्यांनी केली.
(हेही वाचा Amit Shah on Stalin : ‘INDIA आघाडी राजकारणासाठी सनातन धर्माचा अपमान करत आहे – अमित शाह यांचा घणाघात)
Join Our WhatsApp Community