BJP : उद्धव ठाकरे आणि हिंदुत्वाचा काही संबंध उरला आहे का?; भाजपचा टोला

210

तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आणि इतर राज्यात भाजप (BJP) जिंकली की इव्हीएमवर शंका अशी टीका करत उद्धव ठाकरे आता किती रडारड करणार असा सवाल भाजपने विचारला. उद्धव ठाकरे आणि हिंदुत्वाचा काही संबंध उरला आहे का? असाही सवाल भाजपने उद्धव ठाकरे यांना केला. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. त्याला आता भाजपने उत्तर दिले आहे.

काय म्हणाले भाजप? 

उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्वाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत. राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे. राम मंदिराच्या मुद्द्यांवर मंदिर वही बनाऐंगे लेकीन तारीख नहीं बताऐंगे अशी टीका तुम्हीच केली होती. पण आता 22 जानेवारी रोजी मंदिराचे लोकार्पण होत आहे. त्यामुळे तुमच्या पोटात गोळा उठला आहे.

(हेही वाचा Shatabdi Express : शताब्दी एक्स्प्रेसमध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मान; प्रवाशांकडून रेल्वेचे कौतुक)

उद्धव ठाकरेंनी काय केलेली टीका

पाच राज्यांचा निकाल लागला या निवडणुकीत भाजपाला   (BJP) घवघवीत यश मिळाले. आता पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या, त्यामुळे दम असेल तर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची (BMC)  निवडणूक घ्या आणि एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी  भाजपला खुले आवाहन दिले. तुमच्यात आत्मविश्वास असेल तर लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा असे देखील ते या वेळी म्हणाले. सरकारला आणि गौतम अदानी यांना जाब विचारण्यासाठी 16 डिसेंबर धारावीहून अदानींच्या कार्यालायावर शिवसेनेचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.