सेनेकडून टिपूचे पुन्हा उद्दात्तीकरण! प्रजासत्ताकदिनी धर्मांधतेला प्रोत्साहन 

95

शिवसेनेने जेव्हापासून दोन्ही काँग्रेससोबत महाविकास आघाडीची स्थापना केली आहे, तेव्हापासून सेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याआधी मीरा-भाईंदर येथील शिवसेनेचे शहर संघटक सलमान हाशमी यांनी टिपू सुलतानच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या गळ्याभवती हिरव्या रंगाचा शेला गुंडाळल्याचे दाखवले. हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या टिपूचे उद्दात्तीकरण करण्यासाठी ठाकरे सरकारने आणखी एक उपद्व्याप केला. प्रजासत्ताकदिनी मालाड येथे चक्क टिपू सुलतानाचे नाव दिलेल्या मैदानाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेवर टीकेची झोड उगारण्यात आली आहे.

विश्व हिंदू परिषद आणि भाजपचा विरोध

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने २६ जानेवारी रोजी 18व्या शतकातील वादग्रस्त म्हैसूर शासक टिपू सुलतानच्या नावावर मुंबईतील क्रीडा संकुलाचे उदघाटन काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते होणार आहे. या मैदानाला टिपू सुलतानाचे नाव दिल्याने राजकीय वादाला तोंड फुटले आहे. याला विश्व हिंदू परिषद आणि भाजपने विरोध केला आहे. एखाद्या प्रकल्पाचे नाव “क्रूर हिंदूविरोधी” देणे निंदनीय बाब आहे, असे भाजपचे म्हणणे आहे.

(हेही वाचा कोणी बनवली शिवसेनेला टिपूची हिरवी सेना?)

 भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी यासंबंधी ट्विट करून सेनेवर टीकास्त्र सोडले. ‘धर्मांध-क्रूरकर्मा-धर्मद्वेषाने हिंदूंची समूह कत्तल करणारा लुटारू आक्रमणकारी राजा टिपू सुलतान याचे महाविकासआघाडीकडून उदात्तीकरण! वीर पराक्रमी अशी विशेषणे देऊन मालाड मालवणी उद्यानाचा नामकरण कार्यक्रम 26 जानेवारीला! , असे म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.