अजित पवार…राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते..अजित पवारांवर विरोधक नेहमी विचार करूनच एखादा आरोप करत असतात. त्यांना अंगावर घेणे बरेच जण जाणीवपूर्वक टाळत असतात…असाच प्रकार गुरुवारी, २४ जून रोजी भाजप प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत पहायला मिळाला. भाजप कार्यकारणीची बैठक दादरच्या वसंतस्मृती येथे पार पडली. या बैठकीत अनेक ठराव मांडण्यात आले. मात्र हा प्रस्ताव मांडताना चक्क अजित पवार आणि अनिल परब यांच्या विरोधातील महत्वाचा प्रस्ताव शेलार मांडायला विसरले. आता शेलार भाषणाच्या ओघात हा प्रस्ताव मांडायला विसरले की जणीवपूर्वक त्यांनी टाळले, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
नेमका काय होता प्रस्ताव?
गृहमंत्र्यांवरील वसुलीच्या आरोपाप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला. परमबीर सिंग यांच्या पत्राच्या आधारे अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे, तशीच सीबीआय चौकशी अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, अशी मागणी ही कार्यकारिणी करत असल्याचा तो प्रस्ताव होता.
(हेही वाचा : पुण्याच्या आंबिल ओढा येथे स्थानिकांचा आक्रोश! काय आहे प्रकरण?)
चंद्रकांत पाटलांनी भाषणात घेतला मुद्दा!
दरम्यान आशिष शेलार जरी हा मुद्दा विसरले असले, तरी व्यासपीठावर बसलेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा मुद्दा सांगत आणखी काही महत्वाचे मुद्दे बसल्या बसल्या सांगितले. त्यामुळे जरी शेलार विसरले असले, तरी चंद्रकांत पाटील यांनी हा मुद्दा कार्यकारणीत समोर आणला.
म्हणून भाजपची कार्यकारिणी बैठक
राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर विरोधी बाकावर असलेली भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. येत्या काळात ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण यावरून भाजप आक्रमक होणार असून, त्याचसाठी भाजपने रणनीती आखली आहे.
Join Our WhatsApp Community